शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात ‘कृष्णे’साठी राष्ट्रवादीचे उमेदवार आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातून तिन्ही पॅनलमधून एकूण चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तीन उमेदवार जलसंपदा मंत्री ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातून तिन्ही पॅनलमधून एकूण चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तीन उमेदवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक आहेत तर एक उमेदवार स्व. एम. डी. पवार यांच्या घरातील आहे. संस्थापक पॅनलमधून दोघांपैकी एकजण कोण माघार घेणार, यावरच निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी पक्षातीलच उमेदवार एकमेकांविरोधात उभे असणार आहेत.

गत निवडणुकीत माजी नगराध्यक्ष स्व. विजयभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेच चुलतभाऊ संजय पाटील यांनी सहकार पॅनलमधून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात संस्थापक पॅनलकडून युवराज पाटील यांनी आव्हान दिले होते. संस्थापक पॅनलच्या बाजूने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांचे मार्गदर्शन होते. या निवडणुकीत मात्र शहाजी पाटील यांनी घुमजाव करून सहकार पॅनलचा प्रचार सुरू केला आहे. सहकार पॅनलविरोधात रयत पॅनलचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी आपले प्रचार दौरे सुरू केले आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील यांचे पती प्रा. अनिल पाटील (कामेरी) हे सहभागी आहेत. आनंदराव मलगुंडे हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक आहेत. सहकारचे संजय पाटील आणि रयतचे आनंदराव मलगुंडे यांची लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात आहे.

गत निवडणुकीत उभे राहिलेले युवराज पाटील यांनी पुन्हा संस्थापक पॅनलकडून आपला अर्ज दाखल केला आहे. आपली उमेदवारी निश्चित असल्याचे ते मानतात. तर याच पॅनलकडून स्व. एम. डी. पवार यांच्या घरातील माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. या दोघांपैकी कोण? याचा निर्णय अद्यापही झाला नसल्याने दोघांनीही संपर्क दौरे सुरू केले आहेत. शिवाजी पवार यांना त्यांचेच बंधू काॅंग्रेसचे नगरसेवक वैभव पवार यांनी समर्थ साथ दिली आहे. एकंदरीत इस्लामपुरात तिघे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. परंतु, त्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. शिवाजी पवार ‘एकला चलो’ची भूमिका घेऊन संस्थापक पॅनलच्या माध्यमातून प्रचाराला लागले आहेत.

चौकट

पालिकेच्या राजकारणात स्व. एम. डी. पवार यांच्या घरातील विद्यमान विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार यांनी त्यांच्याच घरातील माजी नगरसेवक शिवाजी पवार यांना विरोध केला होता. वैभव पवार यांचे वडील स्व. अशोक पवार हे सहकार पॅनलमधून संचालक होते. वैभव पवार यांनी यापूर्वी रयत पॅनलकडूनही उमेदवारी मागितली होती. आता संस्थापक पॅनलचे उमेदवार शिवाजी पवार यांच्या ते पाठीशी आहेत.