शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नायकवडींच्या निवडीने उलटसुलट चर्चा सुरू

By admin | Updated: July 17, 2014 23:40 IST

पुन्हा पद : विधानसभेचे गणित

मिरज : महापालिका निवडणुकीत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इलियास नायकवडी यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रदेश कमिटी बरखास्त करून प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नेमणूक केली. प्रदेश कार्यकारिणीत पुन्हा एकदा नायकवडी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र व कोकणसाठी प्रभारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण विभागातून अल्पसंख्याकांना राष्ट्रवादीसोबत जोडण्याचे काम नायकवडी यांच्यावर सोपविण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्याशी मतभेद झाल्याने नायकवडी यांनी काँगे्रसला साथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ‘मराठ्यांची आरएसएस’ व ‘न्यू क्रिमिनल पार्टी’ असल्याची टीका केली होती; मात्र आता पुन्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापालिका निवडणुकीतील जयंत पाटील यांच्याशी मतभेद तात्कालीक होते, पक्षनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मतभेद संपुष्टात आल्याचे इलियास नायकवडी यांनी सांगितले. नायकवडी यांच्या निवडीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी राजारामबापूंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळीही जयंतरावांबरोबर त्यांनी इस्लामपूरमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याने नायकवडींना संधी देण्यात आली असावी, असा तर्क लावला जात आहे. (वार्ताहर)