शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचा हल्ला वैफल्यातून : आर. आर. पाटील

By admin | Updated: May 12, 2014 00:03 IST

सांगली : गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची धडक मोहीम सुरु आहे. नक्षलवाद्यांचा कोणताही हेतू साध्य

सांगली : गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची धडक मोहीम सुरु आहे. नक्षलवाद्यांचा कोणताही हेतू साध्य करु दिला नाही. यामुळे त्यांनी गडचिरोलीत वैफल्यातून भूसुरुंग स्फोट घडविला आहे, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात ५५ जणांना अटक केली आहे. ४८ नक्षलवादी शरण आले आहेत. ३७ नलक्षवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. त्यांच्या कारवायांवर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. यापुढे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आजच्या स्फोटामुळे पोलिसांना धक्का बसला आहे. त्यांचे मनोधर्य खचू दिले जाणार नाही. (प्रतिनिधी) बागणीजवळ अपघात; १ ठार आष्टा : आष्टा-वडगाव रस्त्यावर बागणीनजीक वाळूच्या ट्रकने मोटारसायकलस्वारास चिरडले. वाळूच्या ट्रकने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये कुलदीप आप्पासाहेब कोळी (वय ३०, रा. खोची, ता. हातकणंगले) हा तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे दुपारी चारपासून सायंकाळी सहापर्यंत वाहतूक ठप्प होती. घटनास्थळावरून व आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आष्ट्याहून वडगावकडे वाळूने भरलेला ट्रक (एमएच ०९, एल ३४४७) निघाला होता. हा ट्रक बागणीजवळ सराफदार मळ्यानजीक आला असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पहिल्यांदा या ट्रकने समोरून वडगावहून आष्ट्याकडे येणार्‍या वाळूच्या मोकळ्या ट्रकला (एमएच १३, बी ४८३३) धडक दिली. त्यानंतर मारुती व्हॅन (एमएच ४५, ए १८०८) ला धडक दिली. दोन्ही वाहनांना धडक देऊन ट्रक पुढे गेला आणि समोरून येणार्‍या मोटारसायकल (क्र. एमएच ०९, सी आर ३१६८)ला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये डोक्याला मार लागल्याने कुलदीप आप्पासाहेब कोळी हा जागीच ठार झाला. अपघातग्रस्त दोन्ही ट्रकही त्याठिकाणी थांबले होते. अचानक घडलेल्या या घटनेने अपघातग्रस्त ट्रकचालकही भांबावले होते. यामध्ये त्यांना कुठेही दुखापत झाली नाही. धडक दिल्याने वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प होती. पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण, पोलीस उपनिरीक्षक पिरजादे, भूषण महाडिक, आर. के. कदम, बी. एस. खोत, पांडुरंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. (वार्ताहर)