तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज, मंगळवारी दाखल केला. यानिमित्त राष्ट्रवादीचे राज्यातील, जिल्ह्यातील नेते व आर. आर. पाटील समर्थकांनी शहरातून पदयात्रा काढली. अर्ज दाखल करतेवेळी विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सुमनतार्इंचा अर्ज दाखल करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील बाजार समिती परिसरात गर्दी केली होती. प्रारंभी बाजार समितीमधील आर. आर. पाटील यांच्या कार्यालयातून सुमनताई पाटील यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित, कन्या स्मिता यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. तिथून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात असणाऱ्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुमनताई पाटील यांच्यासह कार्यकर्ते रवाना झाले. (वार्ताहर)सांगलीसह सातारा, सोलापूरचे इच्छुकतासगाव-कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत सांगली जिल्ह्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सांगोला येथील दोन, सातारा येथील एक व मुंबईच्या एकाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र चर्चा सुरु होती.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार रिंंगणात राहणार, हे कळणार आहे. त्यानंतरच तासगाव-कवठेमहांकाळचे पोटनिवडणुकीतील रणांगण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीकडे आता लक्ष लागून राहिले आहे.मोहनराव कदम यांचेही ‘बिनविरोध’साठी आवाहनमाजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. आर. आर. पाटील यांचे महाराष्ट्राच्या विकासात आणि आदर्शवत वाटचालीत बहुमोल योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमनताई यांना बिनविरोध निवडून द्यावे, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नाही, ही आम्ही भूमिका घेतलीच, शिवाय सुमनताई यांची बिनविरोध निवड व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आता ‘बिनविरोध’साठी कसरत‘तासगाव-कवठेमहांकाळ’च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बहुचर्चित ठरली आहे. सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘निवडणूक की बिनविरोध’ हा विषय गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात चर्चेचा ठरला. राष्ट्रवादीने केलेल्या आवाहनानुसार सर्वच पक्षांनी सुमनतार्इंना पाठिंबा देत उमेदवार दिलेला नाही. तरीही अपक्षांची गर्दी वाढल्याने ‘बिनविरोध’साठी नेतेमंडळींना तारेवरची करावी लागणार आहे.
कृषी प्रशिक्षण केंद्राला जंगलाचे स्वरूप
By admin | Updated: March 25, 2015 00:03 IST