शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत बाचाबाची

By admin | Updated: August 27, 2014 23:18 IST

बोरगावात जयंतरावांचे मौन : समोर प्रकार घडूनही कानाडोळा; अंगावर जाण्याचाही प्रकार

नितीन पाटील-बोरगाव --(ता. वाळवा) येथील गावभेटीच्या दौऱ्यात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत शाब्दिक वादावादी होऊन अंगावर जाण्याचा प्रकार घडला. मात्र या गोंधळावेळी जयंतरावांनी कोणताही हस्तक्षेप न करता मौन पाळणे पसंत केले. यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात पडले.सोमवार, दि. २५ रोजी रात्री १० वाजता येथील प्रभाग क्र. २ मध्ये जयंतराव आले होते. ग्राहक पंचायत सदस्य आनंदराव शिंदे यांनी वीज कंपनीचा कारभार, ग्राहकांना बसणारा फटका व शिवाजी चौकातील ब्लॉकचे निकृष्ट काम याबाबात प्रश्न उपस्थित केले. मात्र राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव पाटील यांनी शिंदे यांना बोलण्यासाठी मज्जाव केला. यावर शिंदे यांनी जनतेचे प्रश्न मांडू शकतो, असे प्रत्युत्तर दिले. संचालक पाटील यांनी चिडून आधी राजारामबापू बँकेचे थकित कर्ज भरा, मगच जनता दरबारात बोलायला या, असे म्हणताच शिंदे यांनी पाटील यांना ‘हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो जनतेपुढे घेऊ नका, नाही तर तुमची अंडीपिल्ली बाहेर काढायला मलाही वेळ लागणार नाही,’ असे सुनावले. त्यावर माणिक पाटील यांनी ‘सभेच्या बाहेर या, दाखवतो’, असा दम दिला. शिंदे यांनी ‘मला मारणार आहात का?’ अशी विचारणा केल्यावर जयंतरावांच्या समक्षच दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले.राष्ट्रवादीच्या या दोघा पदाधिकाऱ्यांत हा प्रकार सुरू असताना जयंतरावांनी मात्र यावेळी मौन पाळले. काही वेळानंतर अन्य नेत्यांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र या वादाची चर्चा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. जयंतरावांनी अशा उतावीळ पदाधिकाऱ्यांवर अंकुश आणावा, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)