शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा टक्का राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे घसरला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:06 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकऱ्यांच्या ताकदीवर राजकीय पटलावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी झाले. मात्र लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या सलगीमुळे स्वाभिमानीचा टक्का घसरल्याची चर्चा आहे. शेट्टी यांच्याविरोधात सक्रिय असलेली रयत क्रांती संघटनाही लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेली आहे.२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या महाआघाडीत सामील होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले होते. त्यानंतर खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद मिळाले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. दोघांमधील मतभेद वाढतच गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत तर या दोघांमध्ये मोठी दरी पडली. यातून खोत यांनी भाजपची शाल पांघरून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शेट्टी हे खोत आणि भाजप सरकारवरील नाराजीतून काँगे्रस महाआघाडीमध्ये सामील झाले. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेट्टी यांनी निवडणूक लढवली. परंतु हे अनेक शेतकऱ्यांना रूचले नाही. यांनी त्यातल्या त्यात आमदार जयंत पाटील यांच्याशी केलेल्या सलगीवरही सर्वसामान्य शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत होते. आता या परिसरातील मतदानाचा टक्का घसरला आहेच आणि याचा थेट फटका ‘स्वाभिमानी’ला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.प्रारंभीच्या टप्प्यात शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजकीय नांगरट केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाली. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या धैर्यशील माने यांना शेट्टींविरोधात उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून रयत क्रांती संघटनेच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत राज्यभर फिरले. मात्र त्यांची वाळव्यातील रयत क्रांती संघटना बॅफूटवरच गेली.