शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जत राष्ट्रवादीला हव्यात चार जागा

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

सांगली बाजार समिती : जयंत पाटील यांना पदाधिकाऱ्यांचे साकडे

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाशीही युती करा, मात्र जत तालुका राष्ट्रवादीला चार जागा द्या, अशी आग्रही मागणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते व आ. जयंत पाटील यांच्याकडे केली. यासंदर्भात शुक्रवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठकही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे उपस्थित होते.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष बसवराज दोडमणी, चन्नाप्पा होर्तीकर, सिध्दाण्णा शिरसट, महादेव पाटील, राम पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते. बाजार समितीच्या निवडणुकीत जत तालुक्याचे वर्चस्व आहे. सहकारी संस्थेचे २६६८ पैकी ९९१ मतदार जतचे आहेत. ग्रामपंचायतीच्या २२६८ मतदारांपैकी १००४ जत तालुक्याचे आहेत. एकूण ८२२५ पैकी २१७६ मतदार जत तालुक्यातील आहेत. यामुळे या निवडणुकीत जत तालुक्याचे प्राबल्य राहणार आहे. यामुळे जतच्या राष्ट्रवादीला चार जागा सोडण्यात याव्यात. राष्ट्रवादीने कोणाशीही युती करावी, त्यांच्यासोबत जत तालुका राहणार आहे. मात्र जत तालुक्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जयंत पाटील यांनी यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर इतर पक्षांशीही चर्चा सुरु असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर करु असे आश्वासन दिले. विलासराव शिंदे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपापल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. राष्ट्रवादीही सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे. याबाबतचे सर्व अधिकार जयंत पाटील यांना आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यास विलंब लागणार आहे. तरीही येत्या दोन दिवसात आपले धोरण जाहीर करण्यात येईल. नेतेमंडळी चर्चा करुन निर्णय घेतील. सध्या तरी जे इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यासाठी जयंत पाटील बैठक घेणार आहेत. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल. (प्रतिनिधी)इच्छुकांच्या संख्येमुळे निर्णय लांबणीवरसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने राष्ट्रवादी पक्षाने आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे. एके ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक दुसऱ्या पक्षात जाण्याच्या भीतीमुळे ऐनवेळी पक्षाचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. सध्या तरी इच्छुकांकडून उमेदवारी दाखल करण्यात येत आहे. ६ जुलैपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून, पक्षाचे धोरण ४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.