शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी-भाजप युती?

By admin | Updated: July 8, 2015 23:58 IST

तेरा-चारच्या फॉर्म्युल्यावर चर्चा : सूतगिरणीतील समझोत्याने शिक्कामोर्तब

दत्ता पाटील- तासगाव -तासगावसह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे अर्ज काढून घेतले. याचवेळी सूतगिरणीचा समझोता करीत असतानाच बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीत समझोता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात सध्या १३-४ या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे.तासगाव तालुक्यातील बाजार समिती आणि सूतगिरणी या दोन महत्त्वाच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यापैकी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. या निवडणुकीत परंपरेप्रमाणे दोन प्रबळ गट एकत्र येणार, की दोन पक्षात सामना रंगणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सूतगिरणीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीला खिंंडीत गाठण्यासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ताकद नसतानादेखील खासदार पाटील यांनी बाजार समितीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी खेळी खेळली होती. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे आणि आमदार जयंत पाटील यांनी खासदार पाटील यांच्याशी बिनविरोधबाबत चर्चा केली. त्यांनीही होकार देत सर्व अर्ज मागे घेतले. ही प्रक्रियाच बाजार समिती निवडणुकीची नांदी ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याबाबत होकार दिलेला नसला तरी, स्पष्ट नकारही दिलेला नाही. आघाडीबाबत चर्चा सुरू गत निवडणुकीत खासदार पाटील आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार १२-७ च्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप झाले होते. यावेळी खासदार पाटील भाजपमध्ये आहेत. बाजार समितीचे मतदार असणाऱ्या बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १२-७ ऐवजी राष्ट्रवादीला १३ आणि भाजपला ४ जागा, या फॉर्म्युल्यानुसार आघाडी करण्याबाबतदेखील सध्या चर्चा सुरु आहे.तह कोणता?सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीकडून विनंती केल्यानंतर भाजपकडून अर्ज काढण्यात आले. मात्र विनाअट, विनातह करता राजकारणात कोणतीच गोष्ट सहजपणे होत नाही, याची जाणीव तालुक्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत झालेला तह कोणता? याची कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली असली तरी, बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातच तह झाला असून, ऐनवेळी याबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे बोलले जात आहे.