फोटो- वाय फोल्डरमधील एडीव्हीटी फोल्डरमध्ये डॉ. अमृता पाटील नावाने
सांगली : येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ व विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्सच्या संचालिका डॉ. अमृता पाटील यांना राष्ट्रीय गर्भसंस्कार प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूर या अभिमत विद्यापीठाकडून ‘पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग प्रोग्राम इन् गर्भसंस्कार-ॲन्टेनेटल प्रोग्राम’ याचे यशस्वी अध्ययन केल्यानंतर हे प्रमाणपत्र प्राप्त झाले.
गर्भसंस्कार ॲन्टेनेटल सर्व्हिसेस, सृजनांकुर पुणे या संस्थेच्या वतीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरच्या स्वस्थवृत्त व प्रसूतीतंत्र या विभागातर्फ हा अभ्यासक्रम आयोजित केला जातो. या अभ्यासक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी डॉ. अमृता पाटील यांना डाॅ. योगेश जोशी, कमलेश कुमार शर्मा, डॉ. के. भारती, डॉ. बी. पुष्पलता, डॉ. काशीनाथ समगंडी आदींचे मार्गदर्शन लाभले.
'गर्भसंस्कार' या विषयाचे सर्वमान्य मानकीकृत निर्देशन तयार करणे ही काळाची गरज होती. ही प्रक्रिया सृजनांकुर पुणे व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूर या संस्थांनी अत्यंत आदर्शवत पद्धतीने पूर्ण केली आहे. याचा लाभ आता विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्सच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील महिलांना घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी डॉ. अमृता पाटील यांनी केले.