शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जयंत लिगमधून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नावारुपास येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : प्रो-कबड्डी, महाकबड्डीने कबड्डी खेळास घराघरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जयंत कबड्डी लीगमध्ये ...

इस्लामपूर : प्रो-कबड्डी, महाकबड्डीने कबड्डी खेळास घराघरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जयंत कबड्डी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही व्यावसायिक व्यासपीठ मिळेल. या लीगमधून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

येथील जयंत स्पोर्ट्सतर्फे जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय जयंत कबड्डी प्रीमियर लीगचे पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते प्रतीक पाटील, मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव, सांगली जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष रामभाऊ घोडके, पुणे जिल्हा उपकार्याध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने उपस्थित होते. जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ही लिग पाच दिवस चालणार आहे.

खंडेराव जाधव म्हणाले, जयंत स्पोर्ट्सने तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही कबड्डी लीग घेतली आहे. यानंतर महाकबड्डी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूर्वी आम्ही इस्लामपूर व्यायाम मंडळाच्यावतीने जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सुवर्ण चषक राज्यस्तरीय स्पर्धा १० वर्षे घेत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. आम्ही प्रतिराज फौंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहोत.

प्रारंभी सर्व खेळाडू, संघ मालक यांची प्रतीक पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह शहरातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू अभिषेक भुंगे याने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी संघ मालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केक कापून पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजवर्धन लाड, विजय लाड यांच्यावतीने पाटील यांना युवा लिननचा आहेर करण्यात आला. किशोर गावडे (मुंबई), प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेच्या पहिल्यादिवशी शरद लाहिगडे हरिकन्स विरुद्ध जगदीश आप्पा पाटील रायडर्स, तसेच स्फूर्ती रॉयल्स विरुद्ध राजेंद्रभाऊ पाटील फायटर्स यांच्यामध्ये सामने खेळविण्यात आले. यावेळी विनायक पाटील, पै. भगवान पाटील, शहाजी पाटील, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, रणजित पाटील, रूपाली जाधव, छाया पाटील, रोझा किणीकर, सुभाषराव सूर्यवंशी, लिंबाजी पाटील, ब्रह्मनंद पाटील, अतुल लाहिगडे, पृथ्वीराज पाटील, शिवाजी पवार उपस्थित होते.

फोटो ओळी- १६०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर कबड्डी न्यूज

इस्लामपूर येथील जयंत प्रीमियर कबड्डी लीगच्या उद्घाटन समारंभात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतीक पाटील, खंडेराव जाधव, अण्णासाहेब देशमुख, शहाजी पाटील, देवराज पाटील उपस्थित होते.