शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला ६२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:45 IST

खानापूर तालुक्यातील देविखिंडी व सुळेवाडी (विटा) हद्दीतील दगड रॉयल्टी चुकवून विनापरवाना वापरल्याप्रकरणी विटा महसूलने कंपनीला ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे.

विटा (जि. सांगली) : गुहागर ते विजापूर या विटामार्गे नव्याने बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ठेकेदार कल्याणराज देसाई कंपनीने खानापूर तालुक्यातील देविखिंडी व सुळेवाडी (विटा) हद्दीतील दगड रॉयल्टी चुकवून विनापरवाना वापरल्याप्रकरणी विटा महसूलने कंपनीला ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे. संबंधित ठेकेदाराच्या बिलातून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.गुहागर ते कडेगाव, विटा, खानापूर, भिवघाटमार्गे विजापूर या राष्टÑीय महामार्गाचे काम गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम कल्याणराज देसाई कंपनीने घेतले आहे. त्या कामासाठी लागणारी खडी तयार करण्याचे काम देविखिंडी येथे सुरू आहे. त्यामुळे कंपनीचे खडीक्रशर त्याठिकाणी लावण्यात आले आहेत. या क्रशरला लागणारे दगड संबंधित कंपनीने जवळच असलेल्या टेंभू जलसिंचन कालव्याच्या बाजूचे वापरले आहेत. देविखिंडी येथे टेंभू कालव्याच्या बाजूला असलेले सुमारे १ हजार १५३ ब्रास दगड ठेकेदाराने विनापरवाना व रॉयल्टी न भरता घेतले आहेत, तसेच विटा येथील सुळेवाडी हद्दीत असलेल्या टेंभू योजनेच्या कालव्यावरील ६५० ब्रास दगड घेतला. सुमारे १ हजार ८०३ ब्रास दगडाचा चोरून वापर केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संबंधित कंपनीला दि. १६ जानेवारी रोजी ३८ लाख ९७ हजार७९० रुपये, तर दि. १८ फेबु्रवारीला२३ लाख २५ हजार ५० रुपये असा एकूण ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला.।दंडाची रक्कम बिलातून वसूल करणारदंड भरण्याबाबत ठेकेदार कंपनीला आदेश देण्यात आले आहेत. ही रक्कम कंपनीने शासनाकडे जमा केली नाही, तर त्यांच्या राष्टÑीय महामार्ग तयार करण्यासाठी देण्यात येणाºया देयकांमधून (बिलातून) वसूल करून देण्याबाबत राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाला कळविले असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.राष्ट्रीय महामार्गासाठी पाझर तलावातून मुरूम उत्खनन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला परवानगी दिली आहे. या मुरमाची रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. खानापूरजवळ असलेल्या पाझर तलावातून मुरूम घेण्यास ठेकेदाराला परवानगी दिली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी आकारली जात नाही, असे विटा महसूल प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.