शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

By admin | Updated: June 6, 2016 00:46 IST

विनय सहस्रबुध्दे: ‘विकासपर्व’चे सांगलीत आयोजन

सांगली : आपल्याच विचारधारेला कॉँग्रेसने दिलेली तिलांजली आणि सर्वच पातळीवर घोटाळ्यांची मालिका सुरू करणाऱ्या कॉँग्रेस सरकारपासून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे मिळाला. मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार ‘बेदाग’, निष्कलंक असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खा. विनय सहस्रबुध्दे यांनी रविवारी व्यक्त केला. येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्यावतीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विकासपर्व’ या कार्यक्रमात सहस्रबुध्दे बोलत होते. सहस्रबुध्दे म्हणाले की, देशात एका प्रबळ शासकाचा दुष्काळ अनेक दशके पडला होता. राजकीय पक्षांकडे असलेली विचारधारा विकासाचे प्रतिमान गाठण्यात अपयशी ठरत असताना, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा आणि संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न जनसंघापासून भाजपपर्यंत केला. याउलट सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसने विचारधारेचे नातेच संपवून टाकले. एकीकडे समाजवादाबद्दल निष्ठा व्यक्त करायची आणि दुसरीकडे भांडवलदारांचे स्वागत करायचे, या सर्वांतूनच कॉँग्रेसने विचारधारेला तिलांजली दिली होती.जनतेची सुशासनाची तहान मोदी सरकारने भागविली तर आहेच, शिवाय जनताभिमुख कामकाजावर भर दिला आहे. निष्कलंक व्यवहार, गरीब, वंचित, शोषित वर्गाला न्याय, लोकहित, अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य, अशी काही वैशिष्ट्ये मोदी सरकारची सांगता येतील. सुगम्य भारत, पीक विमा योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप्, स्टॅण्डअप् योजना आदी अनेक योजनांतून जनतेला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, संभाजीराव भिडे, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत पटवर्धन, धनंजय खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘फाईव्ह इन वन’ संस्कृतीआजच्या तरूणांना सरकारकडून काय पाहिजे, याचा ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बीएचके फ्लॅट, दोन मुले आणि एक बायको असे सांगितले. आजच्या तरूणांना या संस्कृतीचा ध्यास लागल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले