रोटरी क्लबतर्फे नवमहाराष्ट्र हायस्कूलमध्ये नॅपकीन व्हेन्डिंग मशीन प्रदान कार्यक्रमात गव्हर्नर गिरीश मसुरकर, नंदा झाडबुके व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊनतर्फे नवमहाराष्ट्र हायस्कूलला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीश मसूरकर व इनरव्हील क्लबच्या नंदा झाडबुके उपस्थित होत्या.
रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र लंबे, सचिव धर्मेंद्र खिलारे, खजिनदार विलास सुतार, कम्युनिटी डायरेक्टर सुधीर म्हेत्रे, प्रशांत घोडके, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजमाने यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
गव्हर्नर मसूरकर म्हणाले की, रोटरी इमेज बिल्डिंग या उपक्रमांतर्गत रोटरी क्लबतर्फे विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. याचा फायदा विद्यार्थिनींना होईल. यापूर्वी यंत्रणा बसविलेल्या शाळांतून विद्यार्थिनींच्या अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सामाजिक जबाबदारीच्या हेतूने रोटरी नियमितपणे असे उपक्रम राबविते.
यावेळी विद्यार्थिनी व शिक्षकांना मास्क वाटप करण्यात आले. इनरव्हील क्लबने विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटले.
-----