शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

संख नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

मंजुरीची केवळ घोषणाच : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकीय पाठबळाचा अभाव

गजानन पाटील-दरीबडची -लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकीय पाठबळाचा अभाव यामुळे जत तालुक्यातील संख येथील नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव २००२ मध्ये मंजूर होऊन १२ वर्षे लालफितीत अडकला आहे. मानवी संरक्षण आणि मालमत्तेचे रक्षण यादृष्टीने संखला स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. जिल्हा पोलीसप्रमुख व कोल्हापूर परिमंडलच्या अधिकाऱ्यांनी गेल्याचवर्षी संखला पोलीस ठाणे मंजुरीची घोषणा केली होती. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी गरजेच्या ठिकाणी एका वर्षात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती केली जाणार, अशी घोषणा केली होती. ती हवेतच विरली आहे. महायुतीच्या शासनाकडून त्वरित पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.जिल्ह्यात विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका गुन्हेगारीमध्येही चर्चेत असतो. तालुक्यामध्ये ११७ गावे आहेत. तालुक्याच्या ठिकाणापसून अनेक गावे ६० ते ६५ कि. मी. अंतरावर आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी जत व उमदी ही दोन पोलीस ठाणी पूर्वीपासून कार्यरत आहेत. जत पोलीस ठाण्यात ७२ गावांचा व उमदी पोलीस ठाण्यामध्ये ४५ गावांचा समावेश आहे.उमदी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र कर्नाटक सीमेलगत आहे. कर्नाटकातील विजापूर व इंडी तालुक्याच्या सीमा लागलेल्या आहेत. चंदन, गांजा तस्करी, मटका, खून, मारामारी, दरोडे, वाटमाऱ्या अमानवी कृत्ये, जाळपोळ, लूट, ऊसतोड मजूर व साखर कारखान्यांच्या उचलीच्या फसवणुकीचे प्रकार यासारख्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कार्यक्षेत्रात संवेदनशील गावांची संख्या अधिक आहे. करेवाडी, संख, कोंत्यावबोबलाद, पांढरेवाडी, उमदी, पारधे वस्ती, तिकोंडी भागातील गुन्हेगार व कर्नाटकातील सिध्देवाडी, आरकेरी, चडचण, कन्नूर या भागातील गुन्हेगारांचे कनेक्शन इथल्या भागात आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या घटनेतून पुढे येतोय. कर्नाटक सीमा जवळ असल्यामुळे गुन्हा करून आरोपी पळून जातात. तसेच एखाद्याचा खून करून पुरावा नष्ट करणे, पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी मृतदेह कर्नाटकात टाकले जातात. यामुळे तपास प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण होते. विस्तार मोठा असल्याने भविष्याचा विचार करून गुन्हेगारांवर चाप लावायचा असेल तर, तालुक्यात संख्या रूपाने तिसरे पोलीस ठाणे तातडीचेच आहे. कोणबगी, तिकोंडी, धुळकरवाडी, कागनदी, कोंत्यावबोबलाद हा भाग अतिशय दुर्गम आहे. हा संपूर्ण परिसर कर्नाटक सीमेवर येतो. डोंगराळ स्थिती, रस्त्यांची दयनीय अवस्था, छोटी गावे, दूरवर असणाऱ्या वाड्या-वस्त्या यामुळे या भागात एखादा गुन्हा घडला तर तो उमदी पोलिसांपर्यंत पोहोचून पोलीस तिथवर येईपर्यंत गुन्हेगार पसार झालेले असतात. शिवाय इतक्या मोठ्या भागाला सध्या उपलब्ध असणारी जी पोलिसांची कुमक आहे ती अतिशय कमी आहे. या भौगोलिक परिस्थितीचा विचारही करण्याची गरज नाही. या गावांना उमदी पोलीस ठाणे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नवीन संख पोलीस स्टेशनची गरज आहे.पुन्हा आसंगी तुर्क नकोराज्याला हादरवून सोडणारी आसंगी तुर्क येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना जिवंत जाळण्याची घटना दुपारी तीन वाजता झाली. त्याची माहिती सायंकाळी सहा वाजता उमदी पोलीस ठाण्याला मिळाली. या घटनेची माहिती सांगली मुख्यालयाला अगोदर समजली होती. विरोधी पक्षांनीही याची मागणी केली होती. २0१0 मध्ये नव्याने प्रस्ताव सादर झाला. यात उमदी पोलीस ठाण्याकडील २0 गावे व जत पोलीस ठाण्याकडील १४ गावांचा समावेश आहे.बऱ्याच दिवसांपासून संख पोलीस ठाण्याची मागणी आहे. परिसरातील लोकांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. अवैध धंद्यांना आळा बसणार आहे. पोलीस ठाण्याचा पाठपुरावा सुरू आहे.— चंद्रशेखर रेबगोंडस्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्ष