शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नानांना धक्काबुक्की; पिस्तूल रोखले!

By admin | Updated: February 20, 2017 23:44 IST

तांबवेतील घटना : राजकीय धुमश्चक्री; रक्षकाच्या कृत्यानंतर गावात तणाव, बंदोबस्त तैनात

कऱ्हाड : तांबवे, ता. कऱ्हाड येथे आमदार आनंदराव पाटील व विरोधी गटाच्या उमेदवारासह त्यांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी आमदारांच्या सुरक्षारक्षकाने पिस्तूल रोखल्यामुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तांबवे गटातून आमदार आनंदराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर विरोधी कऱ्हाड विकास आघाडीकडून तांबवेतील प्रदीप पाटील निवडणूक लढवित आहेत. सोमवारी दुपारी आमदार पाटील हे त्यांच्या समर्थकांसह तांबवे येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी काहीजणांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचा आरोप करीत त्याला आक्षेप घेण्यासाठी प्रदीप पाटील व त्यांचे समर्थक रस्त्यावर आले. त्यांनी या प्रकाराबाबत आमदारांना जाब विचारला. त्यामुळे शाब्दिक चकमक उडाली. यादरम्यान धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर आमदारांच्या अंगरक्षकाने स्वत:जवळील पिस्तूल काढून जमावावर रोखली. त्यामुळे प्रदीप पाटील यांचे समर्थक आणखीनच संतप्त झाले. त्यांनी आमदारांसह त्यांच्या समर्थकांना घेराव घालण्यास सुरुवात केली. यावेळीही दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदार आनंदराव पाटील यांच्यासह तांबवेतील प्रदीप पाटील यांना कऱ्हाडला आणले.या घटनेनंतर तांबवे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्ततैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)