शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नागेवाडीत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या हजेरीने चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : लोकनेते संपतरावनाना माने यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला खासदार संजयकाका पाटील, विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख व राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक अशा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.दुष्काळी नागेवाडी येथे माजी आमदार संपतरावनाना माने यांनी यशवंत साखर ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : लोकनेते संपतरावनाना माने यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला खासदार संजयकाका पाटील, विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख व राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक अशा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.दुष्काळी नागेवाडी येथे माजी आमदार संपतरावनाना माने यांनी यशवंत साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर कारखाना कार्यस्थळावर माने यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. काही वर्षे याठिकाणी संपतनानांची जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रम पार पडले. परंतु, कालांतराने त्यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले. याची खंत दुष्काळी तालुकावासीयांच्या मनात सतत राहिली. खानापूर तालुक्याच्या जडणघडणीत संपतराव माने यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या यशवंत कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्वच्छता करून त्यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांना अभिवादन करण्याचा निर्णय राजकीय नेत्यांनी घेतला.रविवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावर खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, संग्राम माने, राजू जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर आदी दिग्गज राजकीय नेत्यांनी माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.संपतनानांच्या पश्चात आमदार अनिल बाबर यांनी यशवंत कारखान्याची धुरा सांभाळली. त्यानंतर हा कारखाना खासदार संजयकाकांच्या गणपती जिल्हा संघाने लिलावात खरेदी केला. रविवारी आमदार बाबर यांच्या विरोधकांनी पहिल्यांदाच कारखाना कार्यस्थळावर एकत्रित जाऊन संपतनानांच्या पुण्यतिथीदिनी अभिवादन केल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.