शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नागजमध्ये ‘टेंभू’च्या पाण्याने जल्लोष

By admin | Updated: April 29, 2016 00:24 IST

मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन : गुलाल, भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा

ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील ओढ्यात ‘टेंभू’चे पाणी रात्री दहाच्या सुमारास आले होते. त्याचे पूजन गुरूवारी प्रभाकर संजय पाटील, जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक चंद्रकांत हाके, जिल्हा परिषद सदस्य राधाबाई हाके, सभापती वैशाली पाटील, औदुंबर पाटील, हायूम सावनूरकर, माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष करीत नागजसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गुलाल, भंडारा उधळत अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला. येथे पाण्याचे औपचारिक पूजन असले तरी, नागजसह परिसरात पाणी कवठेमहांकाळ तालुक्यातील या परिसरात केव्हा येणार, ही उत्सुकता लागली होती. ती गुरूवारी पूर्ण झाली. रमेश साबळे, मिलिंद कोरे यांच्यासह युवकांनी हा आनंदोत्सव साजरा केला. या पाण्याच्या पूजनासाठी ढालगाव येथून विजय घागरे, आरेवाडीतून रावसाहेब कोळेकर, चुडेखिंडीतून बापूसाहेब भुसनूर, कदमवाडीतून पांडुरंग कदम, निमजमधून राम आमुणे, घोरपडीतून माजी सरपंच भगवान सरगर, केराप्पा लोखंडे आदींसह मोठ्या संस्थेने ग्रामस्थ उपस्थित होते. या पाण्याचा नागज, निमज, कदमवाडी, दुधेभावी, चोरोची, ढोलेवाडी या गावांना तर लाभ होणारच आहे, परंतु ढालगाव, कदमवाडी, दुधेभावी, शिंदेवाडी, घोरपडी यांसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. दुधेभावी तलावातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत. टेभूचे पाणी आल्याने आता नागरीकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे. (वार्ताहर)