शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

नागपंचमीसाठी शिराळ्यात कडकडीत बंद

By admin | Updated: July 2, 2015 23:36 IST

चक्री उपोषण सुरू : जिवंत नागाच्या पूजेस परवानगी देण्याची मागणी

शिराळा : शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागपूजा व मिरवणुकीसाठी परवानगी मिळावी, याबाबतचा कायदा शिथिल करावा, या मागणीसाठी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शुक्रवार, दि. ३ रोजी वाघवाडी फाटा (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. या प्रश्नावर दि. २९ जूनपासून राजेंद्र माने बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवारपासून शिराळा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थ, नाग मंडळाचे सदस्य, व्यापारी वर्गाने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी नागपंचमी पूर्ववत व्हावी, अशा घोषणा देण्यात आल्या, शंखध्वनीही करण्यात आला.सरपंच गजानन सोनटक्के, उत्तम निकम, केदार नलवडे, चेतन पाटील, बबलू शेळके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, अविनाश चितुरकर, गणेश आवटे, शिवाजी शिंदे, लालासाहेब शिंदे, संभाजी गायकवाड, बसवेश्वर शेटे, मुस्लिम संघटनेचे के. वाय. मुल्ला, रफीक मुल्ला, हरुण मणेर, औरंगजेब मुल्ला, अविनाश खोत उपस्थित होते.दुपारी आमदार शिवाजीराव नाईक यांनी केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. यावेळी जावडेकर यांनी, रविवार, दि. ५ जुलै रोजी शिष्टमंडळाची भेट घेण्याचे आश्वासन दिले. नागपंचमीबाबत सर्व माहिती व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यानंतर आ. नाईक यांच्याहस्ते सरबत घेऊन राजेंद्र माने यांनी उपोषण सोडले. यावेळी पंचायत समिती उपसभापती सम्राटसिंह नाईक उपस्थित होते. गेले तीन दिवस तहसीलदार विजय पाटील यांनी उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. (वार्ताहर)‘शिराळा बंद’ सुरूचराजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषण सोडल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने चक्री उपोषणास सुरुवात केली. सरपंच गजानन सोनटक्के उपोषणास बसले. शिराळा बंद सुरूच राहणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर करण्यात आले. दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता शांततेच्या मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ होणार आहे. रविवार, दि. ५ जुलै रोजी केंद्रीय वनमंत्री जावडेकर यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. पुढील निर्णयाबाबत तातडीने रात्री बैठक घेण्यात आली.