शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठीच माझी आमदारकी

By admin | Updated: April 20, 2016 00:32 IST

अनिल बाबर : देविखिंडी येथे विकास कामांचे उद्घाटन

विटा : दर्जेदार शिक्षण, चांगले आरोग्य व शेतीला पाणी मिळाल्यानंतर शेतकरी सुखी होईल. सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी शेतीला पाणी मिळाले पाहिजे. दुष्काळ हाच आपला मोठा शत्रू आहे. तो संपविण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपली ताकद द्यावी, असे आवाहन करून दुष्काळाने होरळपणाऱ्या शेतकऱ्यांचा समस्या सोडविण्यासाठीच माझी आमदारकी असल्याचे प्रतिपादन आ. अनिल बाबर यांनी केले.देविखिंडी (ता.खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, दलित वस्ती सुधार योजनेतून कॉँक्रिटीकरण यासह आमदार फंडातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. बाबर बोलत होते. यावेळी सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर, जि. प. सदस्य फिरोज शेख, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. अंकुश निकम यांनी देविखिंडी गावाला टेंभूचे पाणी तसेच रस्ते व समाजमंदिर मंजूर करण्याची मागणी केली. तर जि. प. सदस्य फिरोज शेख यांनी काही लोकांना टेंभूबाबत अपूर्ण माहिती असताना लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा वर्षात जेवढा विकास झाला नव्हता, तेवढा विकास आ. बाबर यांनी दीड वर्षात केलेला असल्याचे सांगितले.सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास सरपंच शीतल माळी, उपसरपंच सुभाष निकम, प्रकाश निकम, सूर्याजी शिंदे, बबन निकम, अरूण केंगार, किशोर डोंबे, सुरेश चिंचणकर, केशव मोरे, विश्वनाथ काटकर, सोपान भारते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश निकम यांनी आभार मानले. (वार्ताहर)यांचा झाला सन्मान...या कार्यक्रमावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ शाळा स्पर्धेत देविखिंडी प्राथमिक शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. जयश्री निकम यांचा आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण गाव धूरमुक्त व्हावे यासाठी वनविभागाच्यावतीने सवलतीच्या दरात देण्यात आलेले घरगुती गॅस कनेक्शन गावातील १६६ कुटुंबांना वाटप करण्यात आले. त्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीत माणसुकी जोपासणारे व स्वत:च्या विंधन विहिरीचे पाणी गावासाठी दररोज मोफत देणाऱ्या ९ ग्रामस्थांचाही यावेळी आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.