शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी उभारली ‘माझी कृष्णामाय’ चळवळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:14 IST

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचे सांडपाणी पोटात घेऊन वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या वेदनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याची जाणीव सर्वांनाच असली तरी, ती दूर करण्यासाठी कोणाचीही पावले उचलली जात नाहीत. उदासीनतेच्या या गर्दीतून बाहेर पडत नदीच्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी आता काही सांगलीकर तरुणांनी कृतिशील चळवळ उभारली ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचे सांडपाणी पोटात घेऊन वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या वेदनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याची जाणीव सर्वांनाच असली तरी, ती दूर करण्यासाठी कोणाचीही पावले उचलली जात नाहीत. उदासीनतेच्या या गर्दीतून बाहेर पडत नदीच्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी आता काही सांगलीकर तरुणांनी कृतिशील चळवळ उभारली आहे.‘माझी कृष्णामाय’ या नावाने सुरू झालेल्या व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला संकल्पनांची, विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली. या ग्रुपमध्ये अभियंते, वास्तुविशारद, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या गटाच्या माध्यमातून काही दिवसातच कृतिशील कार्यक्रमांना सुरुवातही झाली. शालेय स्तरावरच नव्या पिढीच्या मनावर नदी प्रदूषण रोखण्याचे विचार बिंबविण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेण्यात आला. सर्वांची तहान भागवून आरोग्याचा मंत्र देणाºया आपल्या नदीचा आपणच कसा गळा घोटत आहोत, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. जेणेकरून या मुलांकडून घरातील मोठ्यांनाही शहाणपण मिळेल. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे परिणाम तूर्त काही टक्क्यांवर असले तरी त्यातून भविष्यात मोठी चळवळ उभारली जाणार आहे.त्याचबरोबर जे सांडपाणी व कचरा नदीत मिसळतो, त्या स्रोतांमध्ये घातक सूक्ष्म जिवाणूंचे भक्षण करणाºया वनस्पती लावून त्याद्वारे जैविक प्रकल्प राबविण्याचा विचारही या चळवळीतून पुढे आला. याच्या आराखड्याचे कामही आकाराला येत आहे. काहीअंशी याचा अभ्यासही पूर्ण झाला आहे. ज्या शहरांमध्ये अशाप्रकारचा जैविक प्रकल्प राबविण्यात आला, त्याठिकाणच्या माहितीचे संकलनही झाले आहे. तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांच्यापुढे ही संकल्पना यातील काही तरुणांनी मांडली होती. कारचे यांनी या प्रकल्पासाठी हिरवा कंदीलही दर्शविला होता, मात्र त्यांच्या बदलीनंतर ही प्रक्रिया थांबली.शासकीय पातळीवर जरी मदत मिळाली नाही, तरीही तरुणांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कृष्णा नदीचे आरोग्य सुधारण्याचा निर्धार या ग्रुपने केला आहे. त्यास चांगला प्रतिसादही लाभत आहे.नदीबरोबरच विहीर पुनरुज्जीवनाचा कार्यक्र्रमही हाती घेतला आहे. अशा विविध अंगाने ही चळवळ आकाराला येत आहे.प्रदूषणाचा प्रश्न गंभीरसांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी एक कोटी लिटर इतके आहे. याशिवाय अन्य गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळते. तरीही महापालिका क्षेत्रातील प्रदूषण रोखण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास ही चळवळ अन्यत्र राबविता येणार असल्याचे या ग्रुपचे प्रमुख प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले.