शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोनहिरा परिसरात मुरुम, दगडाची तस्करी, प्रशासनाचे दुर्लक्ष : परवाना वीस ब्रासचा, खुदाई शेकडो ब्रासची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:42 IST

देवराष्ट्रे: सोनहिरा परिसर हा सागरेश्वर व चौरंगीनाथ डोगरांदरम्यान वसला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम, दगडाची तस्करी वाळवा तालुक्यात केली जात आहे.

देवराष्ट्रे: सोनहिरा परिसर हा सागरेश्वरचौरंगीनाथ डोगरांदरम्यान वसला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम, दगडाची तस्करी वाळवा तालुक्यात केली जात आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तहसीलदारांकडून २० ब्रास खुदाईचा परवाना मिळवला जातो, मात्र याचा गैरवापर करत शेकडो ब्रास मुरुमाची राजरोसपणे खुदाई केली जात आहे.सोनहिरा हा डोंगराळ परिसर आहे. या परिसरात ताकारी योजनेच्या कालवा खुदाईचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे परिसरात मुबलक प्रमाणात दगड व मुरुम उपलब्ध आहे. परिसरातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, अंबक, चिंचणी, शिरगाव या परिसरातून मोठ्याप्रमाणात मुरुम व दगडाची तस्करी होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोजक्याच कारवाया करून अनेक तस्करांना सोडून दिले. त्यामुळे कारवाईची भीती न राहिल्याने कुंडल, वाळवा, भवानीनगर परिसरात तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यातील काही तस्करांना राजकीय अभय असल्याचीही चर्चा आहे.

ताकारी योजनेच्या कालव्यावर खुदाई केलेला मुरुम व दगड मोठ्या प्रमाणात आहे. तस्कर कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता दिवस-रात्र जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने खुदाई करून डंपर, ट्रॅक्टरमधून याची बेकायदेशीर वाहतूक करतात.रखवालदार गप्पकडेगाव तहसील कार्यालयातून २० ब्रास मुरुम खुदाई व वाहतुकीचा परवाना दिला जात आहे. मात्र या परवान्याच्या जोरावर तस्करी करणारे शेकडो ब्रास मुरुम खुदाई करून वाहतूक करत आहेत. दिवस-रात्र शासनाच्या नैसर्गिक खजिन्यावर माजलेले तस्कर दरोडो घालत असताना, रखवालदार मात्र गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.