शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वृद्धावर खुनी हल्ला

By admin | Updated: August 3, 2014 01:52 IST

प्रकृती चिंताजनक : जखमी ‘किशोर लॉटरी’चे मालक; हल्लेखोरांचे पलायन

सांगली : येथील राजवाडा चौकातील किशोर लॉटरी सेंटरचे मालक हसमुखलाल मनसुखलाल शहा (वय ६४, रा. वखारभाग, सांगली) यांचा पाठलाग करून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी खुनी हल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळील आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये आज, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. घटनेनंतर दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले आहे. हल्ला का व कोणी केला, याचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना रात्री उशिरापर्यंत यश आले नाही. या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टिंबर एरियातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर असे पाच घाव बसले आहेत. यामध्ये डोक्यावरील घाव वर्मी बसला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. शहा हे बेशुद्ध आहेत. यामुळे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही. नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात आली. तथापि त्यांनाही काहीच माहीत नसल्यामुळे हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहा यांचे एका पतसंस्थेशी आर्थिक कारणावरून वाद सुरू आहेत. हा वाद सध्या ग्राहक न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात आज (शनिवार) सुनावणी असल्याने ते स्कूटरवरून निघाले होते. हल्लेखोर दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करीत होते. मात्र हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये हल्लेखोरांनी त्यांच्या स्कूटरला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यानंतर दोन हल्लेखोर दुचाकीवरून उतरले. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या परिसरात वर्दळ कमी असते. यामुळे शहा यांच्या मदतीला कोणीच आले नाही. ग्राहक न्यायालय घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर होते. शहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शहा यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.