शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावातील खून अनैतिक संबंधातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

सांगली : खून करून तासगावातील विहिरीत टाकलेला मृतदेह मंगसुळी येथील जेसीबीमालक हरी येडूपल पाटील (वय २५) याचा असल्याचे ...

सांगली : खून करून तासगावातील विहिरीत टाकलेला मृतदेह मंगसुळी येथील जेसीबीमालक हरी येडूपल पाटील (वय २५) याचा असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. या खुनाचा उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तांत्रिक तपासाच्या आधारावर जेसीबीवरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीला अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

सुनील ज्ञानेश्‍वर राठोड (वय २६), त्याची पत्नी पार्वती सुनील राठोड (वय २६, रा. येलगोड, सिंदगी, जि. विजापूर, सध्या रा. केकेनगर, तासगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले की, तासगाव-भिलवडी रस्त्यालगत शेतातील विहिरीत १० जून रोजी एकाचा मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले होते. मृतदेहाची ओळख पटवून संशयितांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

यादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. या जेसीबीचा मालक मंगसुळी (कर्नाटक) येथील असल्याचे तपासात समोर आले. मंगसुळी येथे जाऊन पोलीस पथकाने मृतदेहाची ओळख पटविली. मृतदेह हरी पाटील याचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गतीने तपास करण्यात आला. जेसीबीवरील ऑपरेटर सुनील व त्याची पत्नी पार्वती यांची नावे पुढे आल्यानंतर दोघांचा शोध घेतला. त्यांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे चौकशी केली असता खुनाची कबुली दिली.

मृत हरी पाटील याचे सुनीलची पत्नी पार्वतीशी अनैतिक संबंध होते. काही वेळा तो तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून सुनीलशी त्याचा वादही झाला होता. त्यानंतर सुनीलने जेसीबीवरील काम थांबविले होते. ८ जून रोजी हरी सुनीलला पुन्हा कामावर बोलविण्यासाठी त्याच्या तासगावातील घरी आला. यावेळी पुन्हा दोघांत वाद झाला. पती-पत्नीने हरीच्या डोक्यात खोरे घालून त्याचा खून केला.

एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, संजीव झाडे, सहायक निरीक्षक रविराज फडणीस, संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक दिलीप ढेरे, अभिजित सावंत, सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, मच्छिंद्र बर्डे, सुहेल कार्तियानी, निसार मुलाणी, संदीप पाटील, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, शशिकांत जाधव, महादेव नागणे यांचा कारवाईत सहभाग होता.

चौकट

मृतदेह दोन दिवस घरातच

हरी पाटील याचा ८ जून रोजी डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. त्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला होता. त्यानंतर तो प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून भिलवडी रस्त्यावरील विहिरीत टाकून दिला. मृतदेह त्याच दिवशी विहिरीत तरंगू लागल्याने खुनाचा प्रकार समोर आला.

चौकट

जेसीबीसह पुण्याला पलायन

पाटील याच्या खुनानंतर सुनील आणि पार्वती राठोड यांनी कामाच्या ठिकाणी पाचशे लिटर डिझेलची चोरी केली. जेसीबीसह दोघांनी पुण्याला पलायन केले. पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक बाबीचा आधार घेत पुण्यातून दोघांच्याही मुसक्या आवळल्या.