शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

मुंबईत खून करून भाडळे घाटात विल्हेवाट

By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST

अनैतिक संबंध : मानलेल्या बहिणीसाठी व्यावसायिकाचा मृतदेह जाळला; महिलेसह सातजणांना अटक

वाठार स्टेशन : मुंबई येथील एका महिलेच्या घरात अनैतिक संबंधातून व्यावसायिकाचा खून करून, नंतर त्याच्याच कारमधून मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात आणून पेटवून दिला. भेळ गाडीवाल्यामुळे ही घटना २१ दिवसांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेसह सातजणांना वाठार पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, कलवीरसिंग गुज्जर (वय ४२) हे इलेक्ट्रिक वस्तूंचे व्यावसायिक घाटकोपरला राहत होते. घराजवळच त्यांचे दुकान आहे. दुकानात रतन ही महिला दहा वर्षांपासून कामास होती. तिच्याशी कलवीरसिंगचे अनैतिक संबंध होते. दरम्यान, अन्य महिलांशीही कलवीरसिंगचे संबंध असल्याचा राग धरून रतनने दुकानात जाणे बंद केले. तरीही, कलवीरसिंग रतनच्या घरी जातच होता. दरम्यान, रतनने मानलेला भाऊ विवेक येवले (रा. अंबवडे संमत, ता. कोरेगाव) याला १३ आॅगस्ट रोजी याबाबतची माहिती दिली. विवेकने सातारा जिल्ह्यातील त्याच्या अन्य पाच मित्रांना घाटकोपरला बोलावून घेतले. त्याच रात्री कलवीरसिंग रतनच्या घरी आल्यानंतर सातजणांनी तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. त्यानंतर कलवीरसिंगच्याच कारमधून (एमएच ०३- ५१५१) त्याचा मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटातील सामाजिक वनीकरणाच्या हद्दीत आणून टाकला. तिथेच रॉकेल ओतून तो पेटवून दिला. कलवीरसिंगची मुलगी व त्याच्या मित्रांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सातारा येथील शाहू स्टेडियमजवळील एका भेळगाडीवर आरोपींपैकी एक तरुण पृथ्वीराज वैराट हा गोंधळ घालत असताना भेळवाल्याने शेजारील गुन्हे शाखेच्या पोलिसाला बोलाविले. त्यावेळी पोलिसांनी खाक्या दाखविताच पृथ्वीराजने घाबरून घाटकोपरच्या घटनेचे भिंग फोडले. त्यानंतर पोलिसांनी विवेक अशोक येवले, निखिल प्रकाश वाघमळे (दोघे रा. अंबवडे संमत, कोरेगाव), राजेश विलास कांबळे (रा. अंबवडे (सं.), कोरेगाव, हल्ली रा. बौद्धविहार, करंजे), संतोष बाबासाहेब बनसोडे (रा. बौद्धविहार, करंजे), पृथ्वीराज अनिल वैराट, दीपक नारायण आवळे (दोघे रा. किकली, ता. वाई) व रतन दयानंद गायकवाड (मूळ रा. भिगवण, जि. पुणे) या सातजणांना ताब्यात घेतले. कलवीरसिंगची मुलगी परबजित कौर हिने या सर्वांविरोधात फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)मृतदेहाचे जळालेले अवशेष ताब्यातएकवीस दिवसांपूर्वी वाठार स्टेशनजवळील भाडळे घाटात ज्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, त्याठिकाणी आज पोलीस गेले. पावसामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष त्यांनी ताब्यात घेतले. संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून रतन गायकवाड हिलाही बारामती येथे जाऊन रात्री अटक केली.