शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याजवळ अपघातात मिरजेची युवती ठार

By admin | Updated: November 15, 2015 01:12 IST

अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात धडक

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ येथे अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत मिरज येथील युवती ठार, तर युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋचा विनोद कोकाटे (वय १८, रा. द्वारकानगर, कुपवाड रोड, मिरज, जि. सांगली) असे मृत युवतीचे नाव असून, अभिषेक कुमार कोडते (वय २३, रा. सलमान हॉटेलजवळ, कुपवाड रोड, मिरज) हा जखमी झाला. अभिषेकवर कोल्हापुरातील कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नातेवाइकांनी सांगितले की, मिरज येथील अभिषेक कोडते व ऋचा कोकाटे हे दोघेजण दुचाकीवरून पन्हाळा येथे शनिवारी सकाळी गेले होते. सायंकाळी हे दोघे दुचाकीवरून पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे वाघबीळमार्गे येत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाची व अभिषेकच्या दुचाकीची धडक झाली. या धडकेत ऋचा कोकाटे ही मुलगी जागीच मृत झाली, तर अभिषेक जखमी झाला. अपघातानंतर या दोघांना जखमी अवस्थेत नागरिकांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी जखमी झालेल्या अभिषेकवर प्राथमिक उपचार करून त्याला खासगी रुग्णालयात पाठविले. अभिषेकच्या मोबाईलवरून कोकाटे व कोडते या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत ऋचा कोकाटे यांची आई मनाली, भाऊ, इतर नातेवाईक व अभिषेकचे वडील कुमार कोडते हे ‘सीपीआर’मध्ये आले. मुलगी मृत झाल्याचे समजताच ऋचाच्या आईला शोक अनावर झाला. मृत ऋचा कोकाटे ही विश्रामबाग येथील चिंतामण व्यापार व वाणिज्य महाविद्यालयात बी. बी. ए.च्या द्वितीय वर्षात, तर अभिषेक हा बी.बी.ए.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. ऋचाचे वडील आर्किटेक्ट-इंजिनिअर असून, आई गृहिणी आहे. जखमी अभिषेकच्या वडिलांचा कोल्हापूर चप्पलचा व्यवसाय आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत रात्री उशिरा झाली. (प्रतिनिधी)