शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पालिकेत चिखल फेको आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंचने दिला इशारा

सांगली : शहरातील शंभरफुटी रस्ता परिसरातील उपनगरांत ड्रेनेज, केबल व पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात चरखुदाई झाली आहे. या परिसरातील रस्ते पूर्ववत न केल्यास महापालिकेत चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंचने दिला आहे. हनुमाननगर, विठ्ठलनगर, त्रिमूर्ती कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, विनायकनगर, शामरावनगर, आप्पासाहेब पाटीलनगर या भागात रस्त्यांची खुदाई झाली आहे. पावसामुळे रस्त्यांची भयानक स्थिती आहे. विचार मंचच्यावतीने आयुक्त अजिज कारचे यांना निवेदनही देण्यात आले होते. त्यांनी पन्नासफुटी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात चार ते पाच डंपर मुरूम टाकून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पालिकेने रस्ते पूर्ववत केले नाहीत, तर रस्त्यावरील चिखल पालिकेत टाकावा लागेल, असा इशारा दिला आहे. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. शहरातील एका मॅटर्निटी होममध्ये शेकडो गर्भपात होतात, याचा पालिकेच्या आरोग्य विभागाला पत्ताही लागत नाही. प्रत्येक बाबीत राज्य व केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून रहावे लागत आहे, असे म्हटले आहे. या पत्रकावर अध्यक्ष उमेश देशमुख, कार्याध्यक्ष रत्नाकर नांगरे, सचिव रियाज जमादार यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)