शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

सांगली : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने नागरिकांना घरपट्टी शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत ...

सांगली : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने नागरिकांना घरपट्टी शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत घरपट्टीच्या शास्तीत १०० टक्के माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ही सवलत १५ फेब्रुवारी ते ३० मार्चअखेर असेल. या सवलतमाफीचा लाभ नागरिकांनी घेऊन घरपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने यांनी केले आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत सभापती पांडुरंग कोरे यांनी करवसुलीबाबत विविध सूचना मांडल्या. त्यावर चर्चा करून घरपट्टीच्या शास्तीत माफी देण्याचा निर्णय घेतला.

इनामदार, कोरे म्हणाले की, २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. नागरिक, व्यापारी व संघटना यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे नागरिक, व्यापारी व संघटनांनी घरपट्टी माफ अथवा सवलत मिळण्यासाठी निवेदन दिले होते. मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. परिणामी, आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊनवर भर दिल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या २३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागरिकांना दिलासा देण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी मार्च २०१२ पर्यंत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगितले.

चौकट

घरपट्टीची ९० कोटी थकबाकी

महापालिकेच्या घरपट्टीची चालू व थकीत अशी ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी २४ कोटींची वसुली झाली आहे. शास्ती, दंडमाफीच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात या निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. नागरिकांनी घरपट्टी भरण्यास प्रतिसाद दिल्यास यंदा मार्चअखेरपर्यंत ५० कोटींची वसुली होऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षी नगरसेवकांना विकासकामांनाही निधी उपलब्ध होणार आहे.

चौकट

कर भरलेल्यांना दिलासा देणार

घरपट्टीच्या थकबाकीदारांना दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाते. ही शास्ती माफ होणार आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. तत्पूर्वी घरपट्टी भरलेल्या नागरिकांनाही दिलासा देण्याचा विचार असल्याचे गटनेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.