शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची वीस कोटींची कामे लटकली

By admin | Updated: June 19, 2015 00:22 IST

आर्थिक अडचण : नगरसेवकांत अस्वस्थता; दोन महिने फायलींवर सह्या न करण्याचा निर्णय

सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील २० कोटींच्या विकासकामांची निविदा मागवूनही त्या उघडण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आयुक्त अजिज कारचे यांनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करीत पुढील दोन महिने कोणत्याही फायलीवर सह्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी शनिवारी होणाऱ्या महासभेत नगरसेवकांकडून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. महापालिकेच्या जनरल फंडातून नगरसेवकांना प्रत्येक २५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, पण वर्षभरात एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली समाधानकारक न झाल्याने या तरतुदीतून कामे करण्यास प्रशासनाने आखडता हात घेतला होता. अखेर स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांनी नगरसेवकांकडून जनरल फंडातील कामे मागवून घेतली. प्रत्येक नगरसेवकाने प्रभागातील गटारी, रस्ते डांबरीकरण, मुरूमीकरण, खडीकरणासह विविध कामे सूचविले. या कामांना स्थायी समितीने मान्यता देत निविदा काढण्याचे आदेश दिले. आयुक्त अजिज कारचे यांनीही कामाच्या निविदा काढण्यास मंजुरी दिली. बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी निविदेतील कागदपत्रांचा लिफाफा उघडला, पण दरासंदर्भातील निविदा उघडली नाही. बांधकाम विभागाला निविदा उघडण्यास प्रतिबंध केले. यासंदर्भात स्थायी समिती सभेत सुरेश आवटी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा शहर अभियंता सी. जी. सोनावणे यांनी आयुक्तांच्या आदेशामुळे निविदा उघडल्या नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन वारंवार विनंती केली. ठेकेदार शासकीय निधीतील कामे करीत नाहीत, तिथे जनरल फंडातील कामे तातडीने करणार नाहीत. त्यासाठी निविदा उघडून ठेकेदारांना समज द्यावा. कामे सुरू होण्यास तीन ते चार महिने लागतील. पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरणाचे कामे थांबून इतर कामांना सुरुवात करता येईल, असा नगरसेवकांचा सूर होता, पण आयुक्तांनी आर्थिक स्थितीचे कारण पुढे करीत येत्या दोन महिन्यांत कोणत्याही फाईलवर सह्या न करण्याचा निर्धार केल्याचे नगरसेवकांनी सांगितले. या कामासंदर्भात नगरसेवकांना नागरिकांतून विचारणा होत आहेत. गटार, ड्रेनेज, मुरुमीकरण अशी कामे असल्याने किमान नागरिकांना कामे सुरु होतील, असे सांगण्याइतपत कार्यवाही व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. पण आयुक्तांनी कठोर भूमिका घेतल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या महासभेत आयुक्तांना याप्रश्नी जाब विचारण्याचा निर्धारही नगरसेवकांनी केला आहे. (प्रतिनिधी)अंदाजपत्रकामुळे अडले२० कोटींची कामे चालू अंदाजपत्रकातील आहेत. त्याला मार्च महिन्यात मंजुरी देण्यात आली होती. पण महासभेत अंदाजपत्रक मंजूर झालेले नव्हते. चालू वर्षाचे अंदाजपत्रक नुकतेच महापौर विवेक कांबळे यांनी प्रशासनकडे दिले आहे. त्यामुळे तीन महिने निविदा उघडण्यात आलेल्या नव्हत्या. अंदाजपत्रक आल्यानंतर या कामांच्या निविदा उघडून मान्यता घेतली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.