शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला दहा वर्षांपासून विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:31 IST

शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना ...

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या दहा वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार होणार की नाही, असा प्रश्न आहे. अजून महापालिकेकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात पर्यावरणाचा अहवाल तयार होऊ शकतो. त्यासाठी प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. महापालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती, हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साºया गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला पडला आहे. त्यामुळे प्रदूषणाची परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.