शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे सूर जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:54 IST

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमीलनाचे सूर निघू लागले आहेत.

ठळक मुद्दे स्थायी सभापती पदावरून संकेतभाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यताहीही निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांच्या आघाडीचे संकेत

शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमीलनाचे सूर निघू लागले आहेत. त्याचा प्रत्यय मंगळवारी स्थायी समिती सभापती निवडणुकीत आला. राष्ट्रवादीने उमेदवार उभा न करता सभापती निवडीत काँग्रेसला ‘बाय’ दिला. एकमेकांचा पैरा फेडत दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्ये समझोता एक्स्प्रेस वेग घेऊ लागली आहे. भविष्यात आघाडी झाली, तर दोन्ही पक्षांना भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढीलवर्षी जून-जुलै महिन्यात होणार आहे.

निवडणुकीला अजून आठ ते दहा महिन्यांचा कालावधी आहे. तत्पूर्वीच महापालिका हद्दीत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. नुकतीच गणेशोत्सव काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी बहुतांश गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. भाजपने वरिष्ठ मंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने मेळावे, बैठका घेत वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. या साºया घडामोडीत सत्ताधारी काँग्रेस काहीशी पाठीमागे पडल्याचे दिसून येते.

मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये महापालिका क्षेत्रातील नेतृत्वाची पोकळी जाणवू लागली आहे. त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे महापालिकेची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीला आमदार पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे दोघेही असले तरी, श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाला काहीअंशी मर्यादा पडत आहेत. त्यातून महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट-तट उभे करीत स्वकीयांसमोरच आव्हान उभे केले आहे. त्याला तोंड देत सत्ताधाºयांकडून कसाबसा महापालिकेचा गाडा हाकला जात आहे.अजूनही महापालिकेत मदन पाटील गटाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यात विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यास महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणेच बदलून जातील, असे गणित मांडले जात आहेत.

राष्ट्रवादीतही सारे आलबेल नाही. शहरात दोन गटात राष्ट्रवादी विभागली गेली आहे. एका गटाचे नेतृत्व संजय बजाज यांच्याकडे, तर दुसºया गटाचे नेतृत्व कमलाकर पाटील यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या डगरीवर हात ठेवला आहे. अशातच महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे, असा मतप्रवाहही कार्यकर्त्यांत आहे. सांगलीतील प्रभाग २२ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांच्या आघाडीचे संकेत मिळत होते.त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही पोटनिवडणुकीतील मदतीचा पैरा स्थायी सभापती निवडणुकीत फेडला. त्यामुळे काँग्रेसचा सभापती बिनविरोध झाला आहे. त्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, प्रशांत मजलेकर यांनी प्रयत्न केले. जयंत पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत यश मिळविल्यानंतर काँग्रेसकडील एकमेव सत्ताकेंद्र असलेल्या महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यताही वर्तविली जात आहे.इच्छुकांना थांबविल्याने नाराजीची चिन्हेस्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीतूनही अनेकजण इच्छुक होते. त्यात मिरजेच्या बसवेश्वर सातपुते यांना संधी मिळाली. काँग्रेसचे दिलीप पाटील, किशोर लाटणे, रोहिणी पाटील हे तिघे इच्छुक नाराज दिसत आहेत. दिलीप पाटील व रोहिणी पाटील यांनी तर अर्ज भरण्यासाठी हजेरीही लावली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीतून महेंद्र सावंत, प्रियंका बंडगरसह तिघे इच्छुक होते. त्यांनाही थांबविण्यात आले. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत सभापती निवडणूक बिनविरोध केली खरी, पण हा निर्णय नगरसेवकांच्या कितपत पचनी पडतो, हे पाहावे लागेल. यातून नगरसेवकांत नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपकडील वाढता कलही दोन्ही पक्षांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू लागला आहे. 

राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील कलकुटगी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती निवडीत आम्ही आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही उमेदवार उभा न करण्याचा शब्द दिला. तो त्यांनी पाळला आहे. यानिमित्ताने दोन्ही काँग्रेसने एकेक पाऊल पुढे टाकले आहे. या घडामोडी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे संकेतच आहेत.- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस