शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका संघाचा जि. प. संघावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी महापालिका विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघात क्रिकेट सामना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी महापालिका विरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी संघात क्रिकेट सामना झाला. या सामन्यात महापालिका संघाने जि. प. संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. महापालिका संघाचे कर्णधार आयुक्त नितीन कापडणीस यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. जिल्हा परिषद संघाने १५ षटकात ८ गडी गमावून ८५ धावा केल्या. जिल्हा परिषद संघात सिकंदर शेख, प्रवीण देसाई यांनी चमकदार कामगिरी केली. आयुक्त कापडणीस यांनी तीन षटकात दोन बळी घेतले. तसेच आजम पटेल व डाॅ. रवींद्र ताटे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना महापालिका संघाची सुरुवात संथगतीने झाली. अमित वायदंडे, रवींद्र ताटे यांनी फटकेबाजी करीत महापालिका संघाला विजयापर्यंत पोहोचविले.या सामन्यात महापालिकेचे भानुदास मोरे, वैभव वाघमारे, नकुल जकाते यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले, तर उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेतलेला झेल लक्षवेधी ठरला. महापालिका संघ विजयी झाल्यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

दुसरा सामना पोलीस आणि महसूल विभागात झाला. सामन्यांचे समालोचन नगरसचिव चंद्रकांत आडके, किशोर गोंधळेकर, काका हलवाई यांनी केले. सामने यशस्वी करण्यासाठी क्रीडाधिकारी महेश पाटील, शहर अभियंता परमेश्वर हलकुडे यांनीही विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी :- महापालिका ‌वर्धापन दिनानिमित्त महापालिका विरुद्ध जि. प. कर्मचारी संघात क्रिकेटचा सामना झाला. या सामन्यातील विजेत्या संघासोबत आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, उपअधीक्षक अशोक वीरकर, वैभव वाघमारे, महेश पाटील आदी दिसत आहेत.