शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या ‘त्या’ मुलाचा कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:09 IST

इस्लामपूर : इस्लामपूर येथील नातेवाईकांकडे देवीची यात्रा करण्यासाठी मुंबईहून आलेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा ...

इस्लामपूर : इस्लामपूर येथील नातेवाईकांकडे देवीची यात्रा करण्यासाठी मुंबईहून आलेल्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीच्या बंधारा परिसरातील पाण्यात तिसऱ्या दिवशी सापडला. त्यामुळे त्याचे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. रोहित रामकुमार यादव (वय १७, रा. सायन, कोळीवाडा, मुंबई) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत सुनील बाबू कुचीवाले (रा. माकडवाले गल्ली, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसांत वर्दी दिली आहे.शुक्रवारी सकाळी १० वाजता सुनील कुचीवाले यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी असे ५० ते ६० जण देवीची यात्रा करून परडी सोडण्यासाठी बोरगाव येथील कृष्णा नदीच्या बंधाºयाजवळ गेले. त्यावेळी रोहित हा त्यांच्यासोबत होता. नदीपात्रात अंघोळ करून सर्वांनी जेवण केले. देवीची परडी सोडून सर्वजण दुपारी चारच्या सुमारास इस्लामपूरला परतले. त्यावेळी रोहित सोबत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यानंतर कुचीवाले कुटुंबीयांनी तातडीने नदी परिसरात धाव घेत, नदीपात्र आणि बंधारा परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे रात्री उशिरा सुनील कुचीवाले यांनी, रोहितला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पोलिसात दिली होती.घटनेनंतर रविवारी तिसºयादिवशी सकाळी सातच्या सुमारास नदीपात्रात परडी सोडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच रोहितचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना निदर्शनास आला. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा हा मृतदेह रोहितचाच असल्याचे सुनील कुचीवाले यांनी ओळखले. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याप्रकरणी सहायक उपनिरीक्षक ए. पी. पाटील अधिक तपास करत आहेत.यात्रेसाठी इस्लामपूरलाइस्लामपूर येथील कुचीवाले कुटुंबाची तीन वर्षातून एकदा मरिअम्मा देवीची यात्रा असते. या यात्रेसाठी कुचीवाले कुटुंबीयांचा नातेवाईक असलेला रोहित मुंबईहून आला होता.