शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

फोटो- १४०७२०२१-विटा-सदाशिवराव पाटील, विटा आ. दि. १५ जुलै.. विटा नगरीचे शिल्पकार लोकनेते स्व. हणमंतराव पाटील साहेब यांची जयंती व ...

फोटो- १४०७२०२१-विटा-सदाशिवराव पाटील, विटा

आ. दि. १५ जुलै.. विटा नगरीचे शिल्पकार लोकनेते स्व. हणमंतराव पाटील साहेब यांची जयंती व माजी आ. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांचा वाढदिवस. स्व. साहेबांच्या सुसंस्कृत विचारांचा वसा आणि वारसा घेऊन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार यासह विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून विटा शहरासह खानापूर मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा देणारे माजी आ. सदाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त...

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक ध्येयवेडा युवक, समाजसेवेचे व्रत घेऊन स्वाभिमानानं, जिद्दीनं, इर्षेनं, कष्टानं, स्वकर्तृत्ववान, जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावरचा ‘सम्राट’ होऊ शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनेते स्व. हणमंतराव पाटील साहेब. विटा नगरीच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक अशा विविधांगी विकासात लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या कर्तृत्वाने भर पडली आहे. त्यामुळेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विटेरूपी कोंदणात एखाद्या ‘कोहिनूरा’प्रमाणे तेजोमय राहिले आहे.

अशाच तेजस्वी विचारधारेचा वारसा लाभलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे विट्याचे सुपुत्र माजी आ. सदाशिवराव (भाऊ) पाटील. आ. विटा नगरवासीयांच्या मनात माजी आ. भाऊंचे स्थान खूप महत्त्वपूर्ण व अढळ असे आहे. भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा प्रत्यय भाऊंच्या वर्तनातून पाहावयास मिळतो. भाऊंनी माणुसकीच्या नात्यातून अगदी लहानांपासून वृध्दांपर्यंत जोडलेले नाते हे अखंड चिरकाल राहील असे आहे. माणसामाणसात विश्वास, प्रेम, आपुलकी निर्माण करीत भाऊंनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले आहे.

ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रपणे ओळख दाखविते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्यावे की. जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमविली आहे. अशी भावना लोकांच्या मनामध्ये भाऊंना भेटल्यानंतर निर्माण होते. अगदी कुणीही भेटलं, समोर आले तर भाऊ तेवढ्याच आत्मीयतेने त्या वक्तींची चौकशी करतात. भाऊंची खासियत म्हणजे प्रत्येकाला ते नावाने ओळखतात व आपलेपणाने चौकशी करतात. तेव्हा सर्वांची स्थिती भरून पावल्यासारखी होते. आदरणीय भाऊ सर्वांशी ‘सर्वाभूती सम ठेवूनिया बुध्दी’ याप्रमाणे समाजात वावरतात.

आपल्या अंगच्या वक्तृत्व कलेने एकाच वेळी हजारो लोकांना समाधानाने तृप्त करायचे भाग्य भाऊंना लाभलेले आहे. जुन्यासह आधुनिक ज्ञानाची सांगण घालण्याचे कौशल्य त्यांना अवगत आहे. लोकांना केवळ ज्ञान आणि माहिती देऊन चालत नाही. तर आपल्या भावनांची दखल व समाधानही अपेक्षित असते. हे ओळखून भाऊ सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्यांच्या भावभावनांशी नाते सांगणारा कोणताही विषय भाऊ तत्काळ सोडवितात. कुण्याच्या घरी सुखद प्रसंग असो किंवा दु:खद प्रसंग असला तरी भाऊ तिथे उपस्थित राहतात. ‘संतसमुदाय मिळती तिथे, लोटांगणे तेथे जावे आधी’ अशी भावना भाऊंना भेटल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींची होते. नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे भाऊंना जोपर्यंत गरीब सामान्य जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला कशाचीही भीती नाही. असा आत्मविश्वास वाटतो. माणूस कोणत्या धर्माचा आहे यावरून तो चांगली किंवा वाईट न ठरता त्याच्या संस्कारावरून ठरत असतो. माणूस म्हणून जगण्यात ऐट असावी. सत्ता, संपत्ती, घराणे, वर्ण, जाती-धर्म यांचे अंगारखे व बुरखे फेकून द्यावेत. तळमळ, कळकळ, प्रांजळपणा हीच आपली जीवनमूल्ये भाऊंनी जोपासली आहेत.

विटा नगरीचे नगराध्यक्ष पद सांभाळत असताना अनेक विकासकामांचा डोंगर रचला आणि २००४ च्या आमदारकीनंतर सलग १० वर्षे विकासकामाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा भाऊंनी प्रयत्न केला. केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी कोणाला तृप्ती देऊ शकणार नाही. प्रयत्नांना आणि समाजसेवेला कोणताही पर्याय न ठेवता आदरणीय सदाभाऊंनी सतत जनतेच्या विकासाचा ध्यास घेतला.

विट्याचे शिल्पकार लोकनेते स्व. हणमंतराव पाटील साहेबांच्या सुसंस्कृत विचारांचा वारसा मा. भाऊंनी सतत जोपासला. त्यामुळेच आजही भैरवनाथाचा कृपा प्रसाद त्यांना मिळत आहे. एक आदर्श नगराध्यक्ष, आदर्श आमदार व एक आदर्श जनसामान्यांचे नेते असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आदरणीय माजी आ. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

- सचिन शिंदे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस, खानापूर