शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

बहुरंगी लढतीमुळे चुरस वाढली

By admin | Updated: October 2, 2014 00:10 IST

इस्लामपूर मतदारसंघ : मतविभागणीचा फटका जयंतराव विरोधकांनाच

युनूस शेख -- इस्लामपूर--आघाडी आणि महायुतीची ताटातूट झाल्यानंतर एकास एक लढत देण्याच्या तयारीत असणाऱ्या विरोधकांचा ताळमेळ न जमल्याने येथे बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १३ उमेदवार राहिले आहेत. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गुफ्तगूमुळे शिवसेनेच्या भीमराव मानेंना निवडणुकीतून अनपेक्षितपणे माघार घेण्याची नामुष्की आली, तर भाजपचे उमेदवार रिंगणात नाहीत.आज माघार घेण्याच्या अंतिम वेळेपर्यंत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना एकास एक उमेदवार देऊन खिंडीत गाठण्याचे जोरदार प्रयत्न झाले; मात्र व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि विचारांची नाळ न जुळल्याने एकास एकची गाठ बांधण्याचा विडा उचललेल्या विरोधी नेत्यांनी स्वत:च कात्रजचा घाट पाहिल्याचे स्पष्ट झाले. अर्ज भरणाऱ्यांत भीमराव माने, वैभव पवार, विक्रम पाटील, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, अ‍ॅड. हंबीरराव पाटील यांचाही समावेश होता, मात्र निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, मनसेचे उदयसिंह पाटील, बसपचे महावीर कांबळे या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांशिवाय स्वाभिमानीचे बंडखोर अपक्ष बी. जी. पाटील, स्वाभिमानी पुरस्कृत अपक्ष अभिजित पाटील, आनंदराव थोरात, विश्वासराव घस्ते, अशोक वायदंडे, दत्तू गावडे, महादेव फसाले, सिनेअभिनेते विलास रकटे आणि वसंतराव हिंदुराव पाटील या उमेदवारांनी लढण्याची तयारी दाखवली आहे. जयंत पाटील यांच्याविरुध्द जितेंद्र पाटील व अभिजित पाटील, बी. जी. पाटील, विलास रकटे यांच्यामध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.इस्लामपूर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्यासारख्या निवडणुकीच्या डावपेचात निष्णात असणाऱ्या उमेदवाराशी ‘एकास एक’ उमेदवार उभा करून टक्कर देण्यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांचे निर्णयक्षमता व राजकीय चातुर्य दुबळे असल्याचे समोर आले. इस्लामपूरची उमेदवारी ठरवताना त्यांनी लावलेला विलंबच कार्यकर्त्यांमध्ये शेट्टीच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारा ठरला. शेट्टीच्या मनात येथून सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार होता; मात्र सदाभाऊ खोत यांचे राष्ट्रवादीचे नेते आणि वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी नकार दर्शवला असेल; मात्र त्याचवेळी सदाभाऊंनंतर दुसरा पर्याय शेट्टी यांनी ठेवला नसल्याने उमेदवारीचा हा घोळ शेवटपर्यंत कायम राहिला.इस्लामपूरएकूण मतदार २,५०,०७०नावपक्षजयंत पाटील राष्ट्रवादीजितेंद्र पाटीलकाँग्रेसअभिजित पाटीलअपक्षमहावीर कांबळेबसपाबी. जी. पाटीलअपक्षउदयसिंह पाटीलमनसेआनंदराव थोरातअपक्षविश्वासराव घस्तेअपक्षअशोक वायदंडेअपक्षदत्तू गावडेअपक्षमहादेव फसालेअपक्षविलासराव रकटेअपक्षवसंतराव पाटीलअपक्ष