प्रवीण जगताप - लिंगनूर मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्याला म्हैसाळ योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा लागून राहिली असून, थकबाकी आणि तोडलेल्या वीज कनेक्शनला लागलेल्या ग्रहणामुळे यंदाचे उन्हाळी आवर्तन अडचणीत आले होते. परंतु आयुक्त कार्यालयाकडून १ कोटी ६२ लाख रुपये भरल्याने विद्युत मंडळाने वीज जोडणी केली. आता लाभार्थी क्षेत्राच्या किमान ७० टक्के क्षेत्रातून पाण्याचे मागणी अर्ज केल्यास आठवडाभरात म्हैसाळच्या कालव्यातून पाणी खळाळू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.याबाबत शासनदरबारी मुंबईतही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी दुपारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांपुढे पुन्हा पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, शासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे. त्यामुळे आता केवळ थकित पाणीपट्टी आणि अपुऱ्या मागणी अर्जांमुळे पाणी सोडण्यात बंधने येत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि शासनाकडून मिळालेले मार्गदर्शन यातून तूर्तास खात्याने तोडगा काढला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपट्टी भरावीच लागणार आहे, पण तूर्तास किमान ७० टक्के मागणी अर्ज आठवडाभरात वेगाने जमा केल्यास पाणी सोडण्यात येईल. शिवाय थकित पाणीपट्टीत तशीच पुढे वाढ होणार आहे. तथापि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यंदाच्या आवर्तनाअभावी होऊ नये, म्हणून पुरेसे मागणी अर्ज आल्यानंतर पाणी लगेच सोडण्यात येणार आहे. याबाबत पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असून मागणी अर्ज जमा करण्यासाठी गावा-गावातील पदाधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे ठरविले आहे.थकबाकी भरल्याने वीज पुरवठा सुरळीतशासनाच्या आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच भरलेल्या १ कोटी ६२ लाख रुपयांच्या रकमेमुळे ५ कोटी ६९ लाख रुपयांच्या थकित वीज बिलाचा आकडा कमी झाल्याने विद्युत मंडळाने तोडलेली वीज सध्या जोडली आहे.
म्हैसाळचे पाणी आठवड्यात मिळणार
By admin | Updated: March 28, 2015 00:03 IST