शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

महावितरणला प्रतीक्षा सात कोटींच्या येण्याची

By admin | Updated: October 21, 2015 23:37 IST

वसुलीचे आव्हान : ७१ हजार ५७६ ग्राहक थकीत

मेहरून नाकाडे -रत्नागिरी जिल्ह्यातील ७१ हजार ५७६ वीज ग्राहकांकडे सुमारे ७ कोटी ११ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदीप व इतर मिळून एकूण ७१ हजार ५७६ ग्राहकांकडे एप्रिल ते सप्टेंबर अखेरची ७ कोटी ११ लाखांची थकबाकी शिल्लक राहिली असून, या वसुलीचे आव्हान महावितरण पुढे उभे ठाकले आहे.घरगुती वीजमीटरतंर्गत चिपळूण विभागातील १४ हजार ६५९ ग्राहकांकडे १ कोटी १६ लाख ५४ हजार, खेड विभागातील १६ हजार ८१८ ग्राहकांकडे १ कोटी २७ लाख ४९ हजार, रत्नागिरी विभागातील २५ हजार ४६६ ग्राहकांकडे १ कोटी ७८ लाख ९० हजार तसेच संपूर्ण जिल्ह््यातील ५६ हजार ९४३ ग्राहकांकडे ४ कोटी २२ लाख ९२ हजाराची थकबाकी शिल्लक राहिली आहे. वाणिज्यिक प्रकारात चिपळूण विभागातील १८३७ ग्राहकांकडे ३८ लाख १५ हजार, खेड विभागातील १८३३ ग्राहकांकडे ३७ लाख ७७ हजार, रत्नागिरी विभागातील ३७३८ ग्राहकांकडे ६० लाख ९१ हजार अशी एकूण ७ हजार ४०८ ग्राहकांकडे एकत्रित १ कोटी ३६ लाख ८३ हजारांची थकबाकी आहे.औद्योगिक प्रकारात चिपळूण विभागातील ३९५ ग्राहकांकडे १९ लाख ४७ हजार, खेड विभागातील ३७० ग्राहकांकडे २१ लाख ६१ हजार, रत्नागिरी विभागातील ८०५ ग्राहकांकडे १६ लाख १७ हजारांची थकबाकी आहे. एकूण १५७० ग्राहकांकडे एकत्रित ५७ लाख २५ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. कृषी पंपातंर्गत चिपळूण विभागातील १४३१ ग्राहकांकडे ८ लाख ७३ हजार, खेड विभागातील ९०७ ग्राहकांकडे ९ लाख ३६ हजार, रत्नागिरी विभागातील १३३५ ग्राहकांकडे ९ लाख ८४ हजारांची थकबाकी आहे. जिल्ह््यातील एकूण ३६७३ कृषीपंप धारकांकडे २७ लाख ९३ हजारांची थकबाकी आहे. पाणीपुरवठा विभागातील चिपळूणतंर्गत २४० ग्राहकांकडे १६ लाख १३ हजार, खेड विभागातील २२६ ग्राहकांकडे १३ लाख २६ हजार, रत्नागिरी विभागातील ४५१ ग्राहकांकडे १४ लाख ३३ हजारांची थकबाकी आहे. जिल्ह््यात एकूण ९१७ ग्राहकांकडे ४३ लाख ७२ हजारांची थकबाकी आहे. पथदीपांतंर्गत चिपळूण विभागातील ३० ग्राहकांकडे ८७ हजार, खेड विभागातील १०० ग्राहकांकडे १ लाख ७४ हजार, रत्नागिरी विभागातील २२ ग्राहकांकडे १ लाख ९१ हजार अश्या एकूण १५२ ग्राहकांकडे ४ लाख ५२ हजार रूपये थकीत आहेत. अन्य प्रकारात चिपळूण विभागात १६५ ग्राहकांकडे २ लाख ६२ हजार, खेड विभागात २६८ ग्राहकांकडे ५ लाख ३३ हजार, रत्नागिरी विभागातील ४८० ग्राहकांकडे १० लाख १७ हजार अश्या एकूण ९१३ ग्राहकांकडे १८ लाख १२ हजारांची थकबाकी आहे. ग्राहकांकडे १० लाख १७ हजार अश्या एकूण ९१३ ग्राहकांकडे १८ लाख १२ हजारांची थकबाकी आहे.सेकंड होम : रत्नागिरीत घर घेणाऱ्यांची संख्या जास्तरत्नागिरी जिल्ह््यातील अनेक मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात राहतात. शिवाय सेकंड होम म्हणून रत्नागिरीत घर घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. मार्चमध्ये महावितरणने वीजबिल बसुलीसाठी मोहीम राबवली होती. त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या थकबाकी वसुलीचे महावितरणपुढे आव्हान उभे ठाकले आहे.कडक मोहीम महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येते. वास्तविक एक महिना वीजबिल भरण्यास उशीर झाला तर वीजजोडणी तोडण्याची भीती असल्याने वसुली जास्त प्रमाणात झाली आहे. अन्यथा थकबाकीची ही आकडेवारी आणखीन वाढली असती. मात्र, ही थकबाकीही कोकण विभागाच्या मानाने जास्त असल्याचे म्हटले जात आहे.