शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत खासदारांची दडपशाही

By admin | Updated: November 1, 2015 00:02 IST

सुमनताई पाटील : राष्ट्रवादीच्या बाजूने एकतर्फी निवडणुका होण्याचा विश्वास

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून दडपशाहीचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. मात्र काही गावांत दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. आर. आर. आबांच्या विचाराने या निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवल्या जात असल्याने, त्यांचा निकाल आमच्या बाजूने एकतर्फीच असेल, असा विश्वासही यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला. खासदारांना तालुक्यावर वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण सुरु आहे. मात्र त्यांना सिध्देवाडी, सावळज, कवठेएकंद, विसापूर, पेड यासह काही गावांत स्वबळावर पॅनेल लावता आलेले नाही. अन्य पक्षांच्या कुबड्या घेत भाजपकडून निवडणूक लढवली जात आहे. बाजार समिती हाणामारीचा प्रकार केला. तरीही त्यावेळी मतदारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले. यावेळीही ग्रामपंचायत निवडणुकांचा कल राष्ट्रवादीच्या बाजूने असून, ३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीला यश मिळेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. योजनेते थकित वीजबिल भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देण्याबाबत पत्र सादर केले आहे. याउलट खासदार समर्थक जिल्हा परिषद सदस्यांनी मात्र निधी दिला नाही. पुणदी योजनेचे पाणी लोढे तलावात सोडून परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी स्वत:च्या शेतीला पाणी मिळावे, यासाठीच नियोजन केले. आबांचे नगरपालिकेतील छायाचित्र काढून स्वत:ची बौध्दिक कुवत दाखवून दिली आहे. त्यामुळे खासदारांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून, विकासाच्या जोरावर राष्ट्रवादीची बहुतांश ग्रामपंचायतीत सत्ता असेल, असा विश्वास यावेळी आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, संचालक जयसिंग जमदाडे, रवी पाटील, तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, युवराज पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) आता श्रेयासाठी पुढे... आर. आर. आबांनी जिवाचे रान करुन विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना सुरु केली. त्यावेळी विरोधकांकडून ही योजना कुचकामी असल्याचा आरोप होत होता. आता हेच खासदार योजनेसाठी सुरु केलेल्या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत आहेत. या योजनेचे श्रेय आबांना मिळू नये, यासाठी डाव खेळला जात आहे. परंतु सामान्य जनतेला ही योजना आबांचीच असल्याचे ठाऊक आहे.