शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पैलवान ते कृष्णा खोरे महामंडळ उपाध्यक्ष व्हाया खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:51 IST

सांगली : आक्रमक पद्धतीने राजकारण करण्याबरोबरच लोकांशी सततचा संपर्क, मनमिळावूपणा, साखरपेरणी अशा वैशिष्ट्यांनी ज्यांचे राजकारण सजते, त्यांच्या नशिबी यशाचे ...

सांगली : आक्रमक पद्धतीने राजकारण करण्याबरोबरच लोकांशी सततचा संपर्क, मनमिळावूपणा, साखरपेरणी अशा वैशिष्ट्यांनी ज्यांचे राजकारण सजते, त्यांच्या नशिबी यशाचे झेंडे आपोआप फडकत असतात. सांगलीच्या सावर्डेकर तालमीतला एक मल्ल ते राजकीय आखाड्यातील दिग्गज पैलवान, असा प्रवास करताना नूतन खासदार संजयकाका पाटील यांनी तुफान संघर्षमय वाटचाल केली आहे.चिंचणी (ता. तासगाव) येथील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ४ जानेवारी १९६५ रोजी संजयकाका पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामचंद्र तथा आर. के. पाटील पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले. अत्यंत धडाडीचे आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. संजयकाका पाटील यांचा जन्म तासगाव तालुक्यातील असला तरी बालपण, तारुण्य सांगली शहरात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. येथील मामांच्या सावर्डेकर तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरविले. तीन वर्षे त्यांनी विविध मैदानांमध्ये मल्ल म्हणून नाव कमावले. मात्र पैलवानकीत ते फारसे रमले नाहीत. शालेय शिक्षणापासूनच त्यांना संघटनबांधणीत यश मिळू लागले. मित्रपरिवार वाढविण्याचे कसब त्यांच्याअंगी होते. त्याचा लाभ त्यांना राजकीय प्रवेशाकरिता झाला. माजी आमदार दिनकरआबा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील हे त्यांचे चुलते.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली शहरात त्यांनी राजकीय कारकीर्द महाविद्यालयीन जीवनापासून सुरू केली. वसंतदादा पाटील यांना प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी राजकारणास सुरुवात केली. सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. कुस्तीच्या डावपेचांपेक्षा त्यांना राजकीय डावपेच, त्याचे कौशल्य, त्याची कार्यपद्धती जास्त भावली. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रगतीचा, संघर्षाचा प्रवास सांगली शहरातूनच सुरू झाला.संजयकाका पाटीलउपाध्यक्ष, कृष्णा खोरे महामंडळ (वय : ५४)शिक्षण : बारावीआक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्धपत्नी ज्योती, मुलगा प्रभाकर, मुलगी वैष्णवीमाजी अध्यक्ष, सांगली जिल्हा युवक काँग्रेसमाजी आमदार (विधानपरिषद)माजी उपनगराध्यक्ष, सांगली नगरपालिकामाजी सदस्य, जिल्हा परिषद सांगलीआर. आर. पाटील यांच्याशी संघर्षाने राज्यभर डंका१९९९ आणि २00४ च्या तासगाव विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी लढत देऊन निसटता पराभव स्वीकारला, मात्र त्यांचा हा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. आर. आर. पाटील यांना शह देणारा नेता म्हणून ते प्रसिद्ध झाले होते.आमदार, महामंडळ आणि खासदारसंजयकाका पाटील यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषविली. २00८ मध्ये त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्टÑवादीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. पाठोपाठ त्यांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर त्यांनी २0१४ मध्ये भाजप प्रवेश करून पुन्हा खासदारकी व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले. तत्पूर्वी १९९३ मध्ये त्यांनी सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भूषविले होते. १९९६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी बाजी मारली. नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती अशा महत्त्वाच्या संस्थांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले. गणपती जिल्हा संघाचे नेतृत्वही ते करीत आहेत.