शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगरपालिकेत खासदार ऑन फिल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेत तब्बल चार वर्षांनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पदाधिकाऱ्यांत खांदेपालट केली. उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद पद बदलल्यानंतर ...

तासगाव : तासगाव नगरपालिकेत तब्बल चार वर्षांनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पदाधिकाऱ्यांत खांदेपालट केली. उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद पद बदलल्यानंतर खासदार संजयकाका पाटील स्वत: ऑन फिल्ड असून पालिकेतील विकासकामांच्या आढाव्यापासून ते प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यांपर्यंत लगबग सुरू केली आहे. लवकरच प्रभागनिहाय आढावा बैठका होणार आहेत.

तासगाव नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष पदामुळे नगराध्यक्षपदाची संगीत खुर्ची झाली नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या संगीत खुर्चीलाही ब्रेक मिळाला होता. तब्बल चार वर्षांनंतर उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर, तर पक्षप्रतोद म्हणून जाफर मुजावर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेच्या कारभारवर लक्ष केंद्रित केले आहे. पंधरा दिवसांत तीनवेळा अधिकारी, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी, मंजूर विकासकामांना गती देण्यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

खासदारांच्या आढावा बैठकांबरोबरच नव्या पदाधिकाऱ्यांनीही पालिकेच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. उपनगराध्यक्ष रेंदाळकर आणि पक्षप्रतोद मुजावर यांनी पालिकेत ठाण मांडून कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

लवकरच खासदार संजयकाका पाटील शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय विकासकामांचा आढावा घेणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

शहरात सत्ताधाऱ्यांची सुरू असलेली लगबग पाहता संभाव्य पालिका निवडणुकीला मैदानात उतरण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

चौकट

नव्या पदाधिकाऱ्यांवर भिस्त

तासगाव नगरपालिकेचा गेल्या चार वर्षांतील कारभार अनेक कारणांनी चर्चेत राहिला. स्वच्छता ठेक्यांपासून ते पालिकेतील ठेकेदारीपर्यंत अनेक कारणांनी पालिकेचा कारभार काळवंडला होता. नव्या कारभाऱ्यांनी पालिकेत ठाण मांडून कामाला सुरुवात केली असली तरी रखडलेल्या कामांचा प्रश्‍न मार्गी लावून आश्‍वासनपूर्ती करण्याची भिस्त नव्या पदाधिकाऱ्यांवर आहे.