फोटो ओळी : निर्माते दिलीप पाटील यांच्या ‘फिलिंग ढगात’ सिनेमाच्या चित्रीकरणाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील, चिमण डांगे, धोंडीराम कारंडे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पत्नी अनुराधा यांच्या नावे सिनेमा प्रोडक्शन निर्मिती कंपनी उभी केली
आहे. या माध्यमातून स्वतः पाटील यांनी ‘फिलिंग ढगात’ या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते इस्लामपुरात करण्यात आला.
दिलीप पाटील यांना लहानपणापासून सिनेमा, नाटक आदी क्षेत्राची आवड होती. त्यांनी ती आजही जोपासली आहे. यावेळी त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना, अगदी जुन्या सिनेकलावंतांपासून ते आजच्या स्थानिक नवीन कलाकारांपर्यंत असलेला त्यांचा जवळीकतेचा संपर्क आणि त्यातील गमती जमती सांगून अगदी जयंत पाटील यांच्यापासून जमलेल्या कलाकार, पदाधिकारी यांची चांगलीच करमणूक केली. याचबरोबर पाटील यांनी प्रास्ताविकासह सर्वांचे स्वागत केले.
यावेळी उदयसिंह देशमुख, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील, संग्राम पाटील, विजय पाटील, धोंडिबा कारंडे उपस्थित होते. महावीर होरे यांनी स्वागत केले. ॲड. चिमण डांगे यांनी आभार मानले.