जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, उपाध्यक्ष कैस अलगूर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, सचिव अजित राजोबा, लताताई पाटील, लताताई दुधाळ, प्रशांत शिकलगार, शंकर चांदकवठे, आदींसह शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आंदोलन केले. तसेच कोरोनाबाबत नियमांचे पालन करत बाजार कसा भरविता येईल याचे प्रात्यक्षिकही संघटनेकडून दाखविण्यात आले.
शंभूराज काटकर म्हणाले, शहरातील सर्व मॉल सुरू आहेत. ठराविक बाजार सुरू ठेवले आहेत. आठवडा बाजार तेवढेच बंद केल्याने संपूर्ण शहरातील ग्राहक सांगलीत गर्दी करू लागले आहेत. प्रशासनाचा गर्दी न करण्याचा हेतू त्यामुळे फसू लागला आहे. अशा पद्धतीने अन्याय झाला तर लोकांच्या समोरचे जगण्याचे आव्हान अधिक मोठे बनणार आहे. सर्व आठवडी बाजार कोरोनाचे नियम पाळून भरणे शक्य आहे. त्यांचे आम्ही प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. त्यामुळे येत्या काळात आठवडी बाजाराबाबतचा निर्णय मागे घेणे गरजेचे आहे.