शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेनंतर महापौर बदलाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:01 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन ...

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन महापौर करण्याची घोषणा केली होती. त्यातच विद्यमान महापौरांचा दहा महिन्यांचा कालावधी जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.महापालिकेत काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज केली होती. गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ४१ नगरसेवक निवडून आले, तर दोन अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. सध्या महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. भाजपने पहिल्यांदाच सत्तेत आल्याने महापौर, उपमहापौर, गटनेता या प्रमुख पदांवर अनुभवी नगरसेवकांना संधी दिली. महापौर पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस होती. गेली २० वर्षे नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या संगीता खोत यांच्यासह नव्याने निवडून आलेल्या सविता मदने, कल्पना कोळेकर, अस्मिता सलगर, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, गीता सुतार यांचा इच्छुकांमध्ये समावेश होता, तर अनारकली कुरणे सर्वसाधारण महिला गटातून विजयी झाल्या असल्या तरी, त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर अनुभवी संगीता खोत यांनी महापौर पदावर बाजी मारली.महापौर निवडीवेळी भाजपच्या नेत्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत तीन महापौर करणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्येक महापौरास दहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार विद्यमान महापौर संगीता खोत यांचा कार्यकाल जूनअखेरीस संपणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेत सामसूम आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवातकेली आहे. जुलै महिन्यात नव्या महापौरांची निवड व्हावी, यासाठी इच्छुक सरसावले आहेत.सांगलीला संधी मिळण्याची शक्यतासध्या महापौरपद मिरज शहराकडे आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता, पुढील महापौर सांगलीचा होईल, असा अंदाज आहे. सांगलीतून महापौर पदासाठी गीता सुतार, अनारकली कुरणे, सविता मदने यांची नावे चर्चेत येणार आहेत. यापैकी कुरणे या अनुभवी नगरसेविका आहेत, तर सुतार व मदने या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, भाजपच्या राजकीय गणितात त्यांची नावे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.