शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

इस्लामपुरात ‘स्वीकृत’च्या हालचाली

By admin | Updated: December 29, 2016 23:12 IST

राष्ट्रवादीत शांतता : आघाडीत दबावतंत्र; नगरसेवक अज्ञातस्थळी

अशोक पाटील ल्ल इस्लामपूरइस्लामपूर पालिकेतील राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी गेले असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी सध्या तरी राष्ट्रवादीत शांतता आहे. सत्ताधारी विकास आघाडीमध्ये विक्रम पाटील आणि शिवसेनेचे आनंदराव पवार नेते आहेत. पवार उपनगराध्यक्ष होण्याच्या तयारीला लागले आहेत, तर ‘स्वीकृत’साठी एल. एन. शहा, सतीश महाडिक, सनी खराडे यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे.उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी बुधवार, दि. ४ जानेवारीरोजी होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आणि अपक्ष दादा पाटील अज्ञातस्थळी गेले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून संजय कोरे यांची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत उपनगराध्यक्षपद आणि सभापतीपदे राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी स्वत: माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे मात्र विकास आघाडीत गटनेते विक्रमभाऊ पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. त्यातच स्वीकृत नगरसेवक घेण्यासाठी विकास आघाडीला एक आणि राष्ट्रवादीला दोन, अशी संधी मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एल. एन. शहा, सतीश महाडिक व सनी खराडे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आता या तिघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.सत्ताधारी विकास आघाडीला आव्हान देण्यासाठी सभागृहात अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक असावा, यासाठी राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्या नावांचा विचार सुरू आहे. परंतु राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी आहे.