शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांविरोधात आंदोलन

By admin | Updated: January 22, 2016 00:51 IST

सुप्रिया सुळे : तासगावात कार्यकर्त्यांशी संवाद

तासगाव : आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अवैध धंदे बंद होते. मात्र भाजप सरकारच्या काळात दारू, मटका यांसारखे अवैध धंदे राज्यभर फोफावले आहेत. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. गुरुवारी तासगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘कॉफी वुईथ खासदार सुप्रिया सुळे’ असा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील, उपसभापती अशोक घाईल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, आर. आर. आबांनी राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आघाडी सरकारच्या काळात राज्यात कोठेच अवैध धंदे सुरु नव्हते. मात्र या सरकारच्या काळात राज्यात सर्वत्र अवैध धंदे जोरात सुरु आहेत. आमदार सुमनताई पाटील यांनीही, अशा धंद्यांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करून, धंदे बंद झाले नाहीत, तर त्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले.आबांनी मतदानाद्वारे दारुबंदीचा निर्णय घेतला. त्यांच्या काळातच देशात महाराष्ट्राच्या पोलीस दलात सर्वाधिक महिलांची भरती केली. आताच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सरकारने चुकीचे काम असेल तर सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही सुळे यांनी दिला. (वार्ताहर)स्मिताने राज्याची जबाबदारी घ्यावी कर्तृत्ववान बापाची कर्तृत्ववान मुलगी, अशी स्मिता पाटील यांची ओळख आहे. राज्यात महिला, मुलींच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे स्मितानेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी यावेळी केले. सप्टेंबरपर्यंत गोडच बोला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, तिळगूळ घ्या आणि सप्टेंबरपर्यंत निवडणुका नसल्यामुळे सर्वांशी गोडच बोला, असे त्यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये नगरपालिकेची निवडणूक असल्याने त्याबाबतचा सूचक इशाराच खासदार सुळे यांनी दिला.