ओळ : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीकांत कबाडे, रमेश हाके, पद्मजा कबाडे, माणिक लवटे उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या माध्यमातून बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, असे प्रतिपादन बागणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य संभाजी कचरे यांनी केले.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथे रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी संभाजी कचरे बोलत होते. यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक श्रीकांत कबाडे, सर्वोदयचे संचालक रमेश ऊर्फ अप्पासाहेब हाके, सरपंच पद्मजा कबाडे, उपसरपंच माणिक लवटे प्रमुख उपस्थित होते. संभाजी कचरे म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व गावांना मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याने या गावातील विकासकामे झाली आहेत.
यावेळी शिवाजी हाके, सुधीर पाटील, शिवाजी पवार, नीता कोळेकर, आरती टोमके, अण्णासाहेब शेडबाळे, सुकुमार वाडकर, ग्रामविकास अधिकारी सचिन बिरनाळे, संजय पाटील उपस्थित होते. प्रकाश कामिरे यांनी आभार मानले.