शिराळा
: येथील संतोष पांडुरंग कदम (रा. नायकुडपुरा, शिराळा) यांची घरासमोर लावलेली (एमएच १० सी. जे. ६९०५) क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. याबाबत संतोष कदम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना दि.२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. पुढील तपास हवालदार डी. एस. खोमणे करत आहेत.