शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली मोटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 01:08 IST

पाच लाखांचा खर्च : विद्यार्थ्यांनी दिले अडीच लाख, मध्यप्रदेश येथील स्पर्धेत सहभागी होणार

इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या २५ विद्यार्थ्यांनी ह्यचारचाकी मोटारगाडीह्ण तयार केली आहे. ही गाडी इंदोर येथील देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. ११० अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मोटार गाड्यांची स्पर्धा होणार आहे.माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देत स्वत: आरआयटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गाडीचे कौतुक केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.आ़ पाटील यांनी मंगळवारी दुपारी आरआयटीला भेट देऊन ह्यगॅलॅक्टस रेसिंगह्ण या ग्रुपने तयार केलेल्या गाडीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गाडीची रचना, इंजिन क्षमता, पल्ला गाठण्याची क्षमता, सुरक्षितता आदी प्रश्न विचारत गाडीची सविस्तर माहिती घेतली़ याप्रसंगी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, संचालिका प्रा़ डॉ़ सुषमा कुलकर्णी, प्रा़ एल़ एम. जुगूळकर, प्रा़ एस़ आऱ पाटील उपस्थित होते़बी़ टेक.च्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षात शिकणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी ही गाडी बनविली आहे़ अभियांत्रिकीमधील प्रत्यक्ष ज्ञान वाढविण्याचा हा एक भाग आहे़ प्रफुल्ल पोटफोडे,आदित्य पंढरपुरे, हंसराज पाटील, ओंकार ओंबाळे, विशाल धुळासावंत, महेश शिंगाडे, प्रतीक बनसोडे, ओम पाटील यांनी आपले सहकारी व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही नवनिर्मिती केली आहे.ही गाडी तयार करण्यास पाच लाख रुपये खर्च आला असून, विद्यार्थ्यांनी स्वत: २ लाख ६० हजाराचे योगदान दिले आहे़ आ़ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू कारखान्याने विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रुपयांचे प्रायोजकत्व घेतले. तसेच राजारामबापू बँक, विराज इंडस्ट्रीज (शिराळा), अ‍ॅक्युरेटस इंडस्ट्रीज (कोल्हापूर), नोवस नॅक्सेस (पुणे), आकलन (पुणे), बॉम्बे रेआॅन (पेठ), सम्राट मोटर्स (सातारा), यशोधन फौडेशन (इस्लामपूर) यांनीही आर्थिक सहकार्य केले आहे.