शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ४० बोगस परवाने ‘रडार’वर

By admin | Updated: April 11, 2017 00:22 IST

महापालिकेचा कारभार चर्चेत : कर्मचारी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

सांगली : महापालिकेच्या बोगस बांधकाम परवाना प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याप्रकरणी आणखी ४० हून अधिक बांधकाम परवाने बोगस असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. या प्रकरणाची चौकशी नगररचना विभागाने सुरू केल्याचे समजते. उशिरा जाग आलेल्या नगररचना विभागाच्या एकूणच कारभारावर बोगस बांधकाम परवाना प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेचा बनावट शिक्का वापरून तसेच बनावट सही करून बांधकाम परवान्यांद्वारे बँकेकडून कर्जे उचलली जात होती. याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनुसार चौकशीअंती हा बोगस प्रकार चव्हाट्यावर आला होता. यापैकी नऊ प्रकरणांच्या छाननीनंतर सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याच नावे बोगस सह्या करुन नगररचना विभागातून बांधकाम परवाना आणि परिपूर्ती प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तरीही प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर चव्हाण यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. आयुक्त खेबूडकर यांनी याची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारीची कारवाई केली होती. बोगस बांधकाम परवाने देताना यावर काही इंजिनिअर, आर्किटेक्टचे शिक्केही वापरले गेले आहेत. त्यामुळे शहरातील काही इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट लोकांचा सहभाग असावा का, की त्यांच्या नावाचे बोगस शिक्के वापरले गेले असावेत, याविषयी शंका आहे. बोगस बांधकाम परवान्याच्या नऊपैकी चार प्रकरणात महापालिकेने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. नऊपैकी तीन प्रकरणातील बांधकाम परवान्यावर एकाच इंजिनिअरच्या सह्या आहेत. आयुक्त खेबूडकर यांनी याची गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली. बोगस परवान्यामुळे नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)सहा महिन्यांपूर्वी तक्रारीबोगस बांधकाम परवान्यासंदर्भात आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. परंतु सहा महिने होऊनही नगररचना विभागाकडून याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नाही. बँकांनी महापालिकेकडे परवाने तपासणीसाठी दिले होते. तरीही नगररचना विभागाकडून त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. या विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यास, नगररचना विभागातील अनेकजण अडचणीत येऊ शकतात. पण तशी तयारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिसत नाही.