सांगली : कोरोनाने सर्वसामान्यांचे जीवन पुरते उद्ध्वस्त करून टाकले. मात्र, याच तणावाच्या वातावरणात कुटुंबाची घडीही विस्कटण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या याच कालावधीत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्याही प्रमाणातील वाढ कायम आहे. काेरोनामुळे सर्व व्यवहार बंद असतानाही बेपत्ता होण्याचे प्रमाण कायम आहे. २०२० मध्ये १७६ प्रकरणे घडली असून, आमिष आणि अजाणत्या वयातील मोह यासाठी घातक ठरत आहे.
अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण कायम असले, तरी यातील अनेक मुलींना पोलिसांनी शोधून त्यांना पालकांच्या स्वाधीनही केले आहे. तर काही मुली मात्र आपल्या कुटुंबाकडे परतल्याच नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
चौकट
२०२० मध्ये १७६ प्रकरणे
राष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारीचा आढावा घेणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १७६ मुली बेपत्ता झाल्या. यातील बहुतांश मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय पोलिसांच्या बालकल्याणविषयक शाखेकडून अशा प्रकरणे तडीस लावण्यातही आली आहेत.
चौकट
८० टक्के मुलींचा लागला शोध
पोलिसांकडून दर वर्षी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येते. राज्य पातळीवरील या मोहिमेत घरातून पलायन केलेल्या, बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. पालकांकडून पुन्हा त्रास होईल या भीतीने न जाणाऱ्या मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. तर विचलित झालेल्या मुलांचे समुपदेशनही करण्यात येते.
चौकट
गुन्हेगारीचीही वाट
घरातून पलायन केलेल्या मुलांमध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न होत असतात. मात्र, यातील काही मुले मात्र गुन्हेगारीत प्रवेश करतात. कुटुंबाचा हरवलेला आधार आणि मिळालेल्या मोकळीकतेमुळे अनेक मुले गु्न्हेगारीत शिरतात. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या गुन्हेगारीतील प्रमाण कमी आहे.