शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उभारणार महापुरुषांचे स्मारक

By admin | Updated: October 13, 2015 00:07 IST

महापालिकेचा प्रकल्प : १२ लाख रुपये प्राप्त; येत्या महासभेत होणार चर्चा

सांगली : शहरातील टिंबर एरिया परिसरातील सि. स. क्र. २६८/१ या जागेवर महापुरुषांचे संयुक्त स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा विषय येत्या महासभेत चर्चेला येणार आहे. एकूण साडेतीन कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सांगलीच्या या आरक्षित जागेवर क्रांती स्तंभाची ४२ फुटी प्रतिकृती व पाच महापुरुषांचे अर्धपुतळे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. बाल, अबाल-वृद्धांसाठी याठिकाणी लॉन, वॉकिंग ट्रॅक, वॉटर एटीएम, रंगीत कारंजे, एलईडी दिव्यांची आकर्षक रचना अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. एक प्रेरणास्थळ म्हणून या स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठीची तांत्रिक मंजुरी शासनाकडून घेण्यात आली आहे. खासदार रामदास आठवले यांनी तातडीने या स्मारकासाठी १२ लाख रुपये महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे उर्वरित निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे. महासभेत यास मंजुरी घेऊन निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. वारसा जतन निधीतून या स्मारकास निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. या निधीतून स्मारकासाठी उर्वरित रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा करण्याचे आठवले यांनी मान्य केल्याचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले. या स्मारकासंदर्भातील आराखडाही तयार करण्यात आला आहे. आराखड्यासह सविस्तर प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात आला आहे. महासभेच्या विषयपत्रिकेवर सातव्या क्रमांकाचा हा विषय असून याविषयी सदस्यांचीही मते विचारात घेतली जाणार आहेत. आराखड्यात काही सुधारणा असतील तर त्यांचाही विचार करून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले आहे. आठवले यांच्याकडून प्रकल्पासाठी १२ लाख प्राप्त झाले असून सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनीही त्यांच्या निधीतून यास मदत करणार असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)अंदाजपत्रक तयार : चार कोटी खर्च होणार महापालिकेच्या आर्किटेक्ट पॅनेलवरचे परीख अ‍ॅन्ड असोसिएटस् यांनी ३ कोटी ८१ लाख २0 हजार ८९७ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. हा आराखडा सुंदर झाल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यास पसंती दर्शविली आहे. सांगलीतील मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड असून त्याचा लाभ नागरिकांना होईल, असे मत ठोकळे यांनी व्यक्त केले. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर सदस्यांना हा आराखडाही पाहण्यास देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आर्किटेक्ट पॅनेलवरचे परीख अ‍ॅन्ड असोसिएटस् यांनी ३ कोटी ८१ लाख २0 हजार ८९७ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. हा आराखडा सुंदर झाल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यास पसंती दर्शविली आहे. सांगलीतील मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड असून त्याचा लाभ नागरिकांना होईल, असे मत ठोकळे यांनी व्यक्त केले. महासभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर सदस्यांना हा आराखडाही पाहण्यास देण्यात येणार आहे. निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार : विवेक कांबळे खासदार आठवले, महापालिकेतील सत्ताधारी नेते मदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर तो तातडीने मंजूर होऊन निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी दिली.